संविधान दिनानिमित्त पत्र सूचना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी इफ्फी मध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले
पत्र सूचना कार्यालयातील अधिकाऱ्यांनी इफ्फी मध्ये साजरा केला संविधान दिन
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2025
संपूर्ण देशभर 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा होत असताना, पत्र सूचना कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, इफ्फी मध्ये समारंभपूर्वक झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावर्षी देश संविधानाची 75 वर्षपूर्ती साजरी करत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पीआयबीच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) च्या कुलगुरू डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यांनी भूषवले.

समारंभाचा एक भाग म्हणून, अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले आणि त्यातील मूल्यांचे पालन करण्याची वचनबद्धता दर्शविली.
या एकत्रित सहभागाने महोत्सवात उपस्थित असलेल्या माध्यम आणि जनसंपर्क क्षेत्रातील सर्व प्रतिनिधींमध्ये संवैधानिक जबाबदारीची भावना, नागरी कर्तव्य आणि राष्ट्रीय एकतेची भावना जागृत झाली.

या सोहळ्याची सांगता सर्व उपस्थितांनी केलेल्या जय हिंद या देशभक्तिपर्ण घोषणेच्या निनादात झाली आणि संविधान आणि त्याच्या मार्गदर्शक मूल्यांप्रती तत्त्वांप्रती राष्ट्राची कायमस्वरूपी आदरभावना प्रतिबिंबित झाली.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2194834
| Visitor Counter:
11