इफ्फी 2025 दिवस 05 : प्रेक्षकांना अंतर्मुख करणाऱ्या कथा : निर्मात्यांनी चित्रपटाद्वारे #IFFIWood मध्ये भावना, अंतर्दृष्टी आणि कल्पनाशक्तीचे केले प्रदर्शन
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2025
गोव्यातील पणजी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (IFFI) 2025 च्या पाचव्या दिवशी चित्रपट निर्माते, लेखक, कथाकार आणि सर्जनशील संघांनी समृद्ध संवाद, प्रदर्शन आणि विचारप्रवर्तक पत्रकार परिषदांनी भरलेला दिवस साजरा केला.
प्रत्येक संवादाने महोत्सवातील काही सर्वात आकर्षक कामांमागील सर्जनशील प्रक्रियांमध्ये एक खिडकी उघडली - ओळख आणि स्मृतींच्या अंतरंग शोधांपासून ते पर्यावरणीय बदल, सांस्कृतिक वारसा आणि मानवी लवचिकतेवरील शक्तिशाली कथांपर्यंत विविध विषयांची हाताळणी
वैयक्तिक प्रवास, ऐतिहासिक प्रतिध्वनी आणि समकालीन वास्तव प्रतिबिंबित करणारे विविध प्रकारच्या चित्रपटीय आवाजांचा पट प्रेक्षकांसमोर उलगडला. आव्हान देणाऱ्या, बरे करणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या तसेच प्रेरणा देणाऱ्या कथांसह आत्मा, मन ढवळून काढणाऱ्या आणि जगाबद्दलची आपली समज विस्तृत करणाऱ्या कथांचा उत्सव म्हणून; इफ्फीचा पाचवा दिवस वेगळा ठरला.
पत्रकार परिषदांमधील चित्रपट
पत्रकार परिषद 1: लाला आणि पॉपी
इफ्फी 2025 मध्ये ‘लाला आणि पॉपी’ झाली पत्रकार परिषद
लाला आणि पॉपी मुंबईत घडणाऱ्या एका लिंगभेदी प्रेमकथेचा शोध घेते, ज्यामध्ये दोन तरुण - लाला आणि पॉपी - आपले भावनिक बंध घट्ट धरून त्यांच्या संक्रमणांमधून मार्ग काढतात. हा चित्रपट अशा जगातील ओळख, स्वीकृती आणि प्रेमाच्या लवचिकतेबद्दल गहन प्रश्न उपस्थित करतो जे बहुतेकदा द्विधा मनाच्या पलीकडे जाऊन जगणाऱ्यांना समजून घेण्यास अपयशी ठरतात.


निर्माते बॉबी बेदी यांनी चित्रपटाच्या सार्वत्रिक गाभ्याला अधोरेखित केले: “माणसे प्रथम येतात, लिंगभाव नंतर.” गेल्या वर्षीच्या इफ्फीमध्ये त्यांनी या प्रकल्पाचा जन्म कसा झाला हे सांगितले, जे भारताच्या विकसित होत असलेल्या सामाजिक परिदृश्याचे प्रतिबिंब आहे जिथे कायदेशीर मान्यता आहे परंतु सामाजिक स्वीकृती हळूहळू वाढत आहे.

दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांनी या चित्रपटाचे वर्णन - प्रेमाची एक प्रामाणिक, जागतिक कहाणी - असे केले. ही कहाणी दोन पारलिंगी नायकांमधील आहे. वर्षानुवर्षे केलेल्या संशोधन आणि समलैंगिक समुदायांसोबतच्या असलेल्या सहभागाने पटकथेला आकार दिला, ज्यामध्ये प्रामाणिकपणा, सूक्ष्मता आणि भावनिक सत्यावर भर देण्यात आला आहे.

पत्रकार परिषद 2: इन परस्यूट ऑफ स्प्रिंग + फ्लड
फ्लड
निर्मात्या कॅटरिना क्रॅनाकोवा यांनी सांगितले की, जलसाठ्याच्या बांधकामानंतर पूर हे स्लोवाक गावाच्या विस्थापनाचे कारण ठरले. माजोवा प्रदेशात चित्रित झालेल्या या चित्रपटात जवळजवळ 80% रुथेनियन अल्पसंख्याक कलाकार आपल्या मूळ भाषेत सादरीकरण करतात—ही संधी पडद्यावर क्वचितच पाहायला मिळते.
या चित्रपटाचा दुसरा जागतिक प्रीमियर इफ्फी गोवा येथे झाला. कथेला प्रेरणा देणाऱ्या वास्तविक जीवनातील प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या समुदायांसाठी एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्याची आशा चमूने व्यक्त केली.


इन परस्यूट ऑफ स्प्रिंग
दिग्दर्शक अयुब शाखोबिद्दिनोव आणि मुख्य अभिनेत्री फरिना जुमाविया यांनी उझबेक चित्रपटाचे प्रतिनिधित्व केले होते, ज्यामध्ये राहत शुकुरोवा हे पात्र दीर्घकाळ दडवून ठेवलेली गुपिते आणि भावनिक जखमा यांना तोंड देत असल्याचे चित्रण केले आहे. सोव्हिएत कालखंडाच्या शेवटी शेवटी घडलेल्या या चित्रपटातील उपचार, सलोखा आणि आत्म-शोध या विषयांवरील प्रासंगिकता आजही कायम आहे.
इफ्फी हे जागतिक चित्रपट आणि संस्कृती एकत्र आणणारे एक महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे, अशा शब्दांत दिग्दर्शकाने इफ्फीचे कौतुक केले.

पत्रकार परिषद 3: रुधिरवन
इफ्फी 2025 मधील ‘रुधिरवना’ची तिसरी पत्रकार परिषद



‘रुधिरवना’ चित्रपटाची कथा जंगलात अडकून पडलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांच्या गटाभोवती फिरते. एक रिसॉर्ट बांधकाम प्रकल्प आणि स्थानिक आदिवासी जमात दादासी यांच्यातील हिंसक संघर्षामुळे या अधिकाऱ्यांना जंगलात आसरा शोधावा लागतो. कुजत चाललेल्या एका ट्री-हाऊसमध्ये हे अधिकारी आश्रय घेतात पण तिथे त्यांना बाहेर सुरू असलेल्या संघर्षापेक्षा कितीतरी भयंकर अशी अतिमानवी शक्ती भेटते.

हा चित्रपट जंगलतोडीबद्दलच्या मानवी चिंता एका भिषण, अलौकिक कथेच्या माध्यमातून सादर करतो. या कथेत निसर्ग स्वतःच्या ऱ्हासाचा बदला घेण्यासाठी एका प्राचीन दैत्याच्या रूपात प्रकट होतो.
पत्रकार परिषद 4: माँ, उमा, पद्मा (ऋत्विक घटक) — पुस्तक प्रकाशन
या विशेष पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात महान चित्रपट दिग्दर्शक ऋत्विक घटक यांना सन्मानित करण्यात आले. वक्त्यांनी त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीवरील कायमस्वरूपी प्रभावाची आणि त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी केलेल्या संघर्षांची आठवण करून दिली.



लेखक कामरान यांनी घटक यांच्या प्रशिक्षणाबद्दलच्या गैरसमजुतींचे निराकरण केले. घटक यांचे प्रारंभीच्या काळातील लेखन, त्यांच्या समकालीन महान व्यक्तींसोबतचे त्यांचे सहकार्य तसेच आयझेनस्टाईन आणि स्टॅनिस्लाव्हस्की यांच्या कामांशी त्यांचा सखोल नात्याचा उल्लेख कामरान यांनी केला. घटक यांच्या एफटीआयआय मधील अध्यापनाच्या कारकिर्दीने चित्रपट विचार आणि अध्यापनशास्त्रातील त्यांचे योगदान आणखी अधोरेखित केल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषद 5: हमसफर + पिपलांत्री: अ टेल ऑफ इको-फेमिनिझम + बॅटलफील्ड
हमसफर
हमसफर एका आजोबांच्या भावनिक प्रवासाचे चित्रण करते. त्यांचा मौल्यवान जुना रेडिओ – हा त्यांचे आयुष्यभराचे ‘सोबती’ असतात तो हरवतो. हा चित्रपट भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर प्रकाश टाकतो. साध्या वस्तू देखील ओळख, स्मृती आणि भावना यांच्या अशा वाहक बनतात, या भारतीय सांस्कृतिक मूल्यांना हा चित्रपट उजाळा देतो. हरवलेल्या वस्तूतील आपलेपणा, हुरहूर आणि न तुटणारे नाते यांची ही हळूवार कथा आहे.
पिपलांत्री: अ टेल ऑफ इको-फेमिनिझम
हा वैशिष्ट्यपूर्ण माहितीपट राजस्थानमधील पिपलांत्री गावातील विलक्षण पर्यावरणीय आणि सामाजिक परिवर्तनाचा मागोवा घेतो. दिग्दर्शक-निर्माता सूरज कुमार यांनी दूरदर्शी सरपंच श्याम सुंदर पालीवाल यांनी पर्यावरणीय दुःखाचे रुपांतर स्त्री-वादी पर्यावरण चळवळीत कसे केले, याचा मागोवा या माहितीपटात घेतला आहे. या चळवळीत गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी 111 झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे..
जागतिक मान्यता आणि संयुक्त राष्ट्रांच्या स्वारस्यामुळे, हा चित्रपट समुदायाची जिद्द, पर्यावरणीय पुनरुज्जीवन आणि महिला-केंद्रित विकासाची शक्ती साजरी करतो.
बॅटलफील्ड
1944 च्या इम्फाळच्या लढाईच्या जखमांच्या पार्श्वभूमीवर, हा चित्रपट मणिपूरमधील दुसऱ्या महायुद्धातील सर्वात रक्तरंजित प्रकरणांपैकी एकातील भौतिक पुरावे आणि वैयक्तिक साक्षी उलगडण्यासाठी राजेश्वर यांच्या प्रयत्नांचे प्रदर्शन करतो. उत्खनन आणि वाचलेल्यांच्या कथांद्वारे, हा माहितीपट युद्धाचा दैनंदिन जीवनावर होणारा मानसिक परिणाम अभ्यासला आहे. त्याचबरोबर हिंसाचार सांस्कृतिक स्मृतींना कसा आकार देतो, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



पत्रकार परिषद 6: सॉंग्ज ऑफ ॲडम + स्किन ऑफ यूथ
सॉंग्ज ऑफ ॲडम
1946 मधील मेसोपोटेमियाच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा 12 वर्षांच्या ॲडमची आहे. ॲडमने आपण कधीच मोठे व्हायचे नाही, असे ठरवलेले आहे त्यामुळे त्याच्या सभोवतालच्या लोकांना अनेक प्रश्न पडतात आणि तो लोकांना काळाच्या अटळ प्रवासाचा सामना करण्यास भाग पाडतो. हा चित्रपट म्हणजे निरागसता, अपरिहार्यता आणि भावनिक सत्य यांची एक काव्यात्मक कथा आहे.
स्किन ऑफ यूथ
1990 च्या सायगॉनच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट स्वतःची ओळख शोधणाऱ्या तृतीयपंथी तृतीय पंथी ‘सेक्स वर्कर’ आणि तिच्या स्वप्नाला पाठिंबा देण्यासाठी धडपडणाऱ्या केज फायटर यांची संघर्षात्मक प्रेम कथा मांडतो. स्वतःचा स्वीकार, वैयक्तिक संघर्ष, हिंसक अंडर वर्ल्ड आणि स्वतःला शोधण्याची नाजूक आशा - या सर्व आघाड्यांवर त्यांच्या प्रेम कथेला परीक्षा द्यावी लागते.




इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2194155
| Visitor Counter:
5