गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शीख धर्माचे नववे गुरू, 'हिंद की चादर', गुरू तेग बहादूर जी यांना 350 व्या बलिदान दिवसानिमित्त वाहिली आदरांजली
गुरू तेग बहादूर जी, काश्मिरी पंडितांसाठी लढले, त्यांनी जुलमी मुघलांना आव्हान दिले आणि धर्मासाठी दिले सर्वाच्च बलिदान
Posted On:
25 NOV 2025 12:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी शीख धर्माचे नववे गुरू, 'हिंद की चादर', गुरू तेग बहादूर जी यांना त्यांच्या 350 व्या बलिदान दिवसानिमित्त नमन करून आदरांजली वाहिली.
अमित शहा यांनी ‘X’या समाजमाध्यमवरील पोस्टमध्ये म्हटले आहे, 'शीख धर्माचे नववे गुरू, 'हिंद की चादर', गुरू तेग बहादूर जी यांच्या 350 व्या बलिदान दिवसानिमित्त मी त्यांना नमन करतो आणि आदरांजली वाहतो.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, 'गुरू तेग बहादूर जी यांनी आपल्या जीवनकाळात आध्यात्मिक साधना केली, सत्संग केले आणि क्रूर आक्रमकांपासून आपल्या संस्कृतीचे आणि स्वधर्माचे संरक्षण केले. त्यांनी काश्मिरी पंडितांसाठी संघर्ष केला, जुलमी मुघलांना आव्हान दिले आणि धर्मासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
शौर्य, संयम, त्याग आणि समर्पणाने ओतप्रोत गुरू साहिब जींच्या बलिदानगाथेचे स्मरण करताना आजही मन अभिमानाने आणि राष्ट्रसंरक्षणाच्या संकल्पाने भारावून जाते.
* * *
सुवर्णा बेडेकर/सोनाली काकडे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2194006)
Visitor Counter : 6