पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने मिळवलेल्या पहिल्या T20 अंध महिला क्रिकेट विश्वचषक विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 24 NOV 2025 7:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे, अंध महिला T 20 विश्वचषक प्रथमच जिंकून इतिहास रचल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

संपूर्ण मालिकेत अपराजित राहून केलेल्या संघाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे आणि  कठोर परिश्रम, सांघिक कामगिरी आणि दृढनिश्चयाचे ते एक चमकदार उदाहरण असल्याचे  म्हटले आहे. यातील प्रत्येक खेळाडू हा खरा चॅम्पियन आहे ज्याच्या समर्पणाने देशाला हा  गौरव प्राप्त झाला आहे,असे पंतप्रधानांनी  अधोरेखित केले आहे 

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले :

"पहिला अंध महिला टी-20 विश्वचषक जिंकून इतिहास रचल्याबद्दल भारतीय अंध महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन! त्याहूनही कौतुकास्पद म्हणजे त्या मालिकेतील सर्व सामन्यांत  अपराजित राहिल्या. ही खरोखरच एक ऐतिहासिक  कामगिरी आहे, कठोर परिश्रम, सांघिक कार्य आणि दृढनिश्चयाचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे.यातील  प्रत्येक खेळाडू एक विजेता आहे! संघाला त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा.त्यांची  ही वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील."


गोपाळ चिपलकट्टी/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2193742) आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam