पंतप्रधान कार्यालय
भविष्यासाठी सज्ज अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या सरकारच्या परिवर्तनकारी कामगार सुधारणांवर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
Posted On:
24 NOV 2025 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
भारत आज विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून उदयास आला असल्याचे ठामपणे विशद करणारा एक लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केला आहे, या लेखामध्ये भविष्यासाठी सिद्ध असलेल्या अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या सरकारच्या परिवर्तनात्मक कामगार सुधारणांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी अलीकडेच लिहिलेल्या लेखात या सुधारणांच्या दूरगामी परिणामांचा उहापोह केला आहे. या सुधारणांमुळे अनुपालनात सुलभता येणार असून त्या महिला कामगारांना सक्षम बनविणाऱ्या आणि जागतिक मूल्य साखळीत भारताचे स्थान अधिक बळकट करणाऱ्या आहेत
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलने एक्स या समाजमाध्यमावरच्या यासंदर्भातील पोस्टमध्ये म्हटले आहे की:
"एक विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून भारत पुढे आल्याची जग दखल घेत आहे. भविष्यासाठी सज्ज अर्थव्यवस्था, अनुपालन सुलभता, महिला कामगारांचे सक्षमीकरण आणि जागतिक मूल्य साखळीतील भारताचे स्थान मजबूत करण्याप्रती असलेली सरकारची वचनबद्धता नव्या कामगार सुधारणांमधून व्यक्त होते!"
केंद्रीय मंत्री डॉ. @mansukhmandviya यांच्या अभ्यासपूर्ण लेखावर चिंतन करा.
निलीमा चितळे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193630)
Visitor Counter : 14