पंतप्रधान कार्यालय
जागतिक मुष्टियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेत अद्वितीय विक्रमी कामगिरी केल्याबद्दल भारताच्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
Posted On:
24 NOV 2025 12:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मुष्ठियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेत अद्वितीय विक्रमी कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
आपल्या खेळाडूंनी 9 सुवर्णपदकांसह एकूण 20 पदके जिंकली, ही भारताच्या मुष्टीयोद्ध्यांची एक ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हे यश देशाच्या मुष्टीयोद्ध्यांचा निर्धार, दृढ संकल्प आणि अथक भावनेचे आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
या संदर्भात एक्स या समाज माध्यमावर पंतप्रधानांनी सामायिक केलेला संदेश :
"आपल्या दमदार खेळाडूंनी जागतिक मुष्टियुद्ध चषक फायनल्स 2025 स्पर्धेत अद्वितीय, विक्रमी कामगिरी केली! त्यांनी 9 सुवर्णपदकांसह एकूण 20 पदके जिंकली. हे सर्व आपल्या मुष्टीयोद्ध्यांच्या दृढ संकल्प आणि निर्धारामुळे शक्य झाले. त्यांचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा."
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2193472)
Visitor Counter : 8