पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जी 20 शिखर परिषद 2025 च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधानांची घेतली भेट

प्रविष्टि तिथि: 23 NOV 2025 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 नोव्हेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी 20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर  इटालियन प्रजासत्ताकच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. याआधी जून  मध्ये कॅनडा मध्ये काननास्किस येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी संवाद साधला होता.

नवी दिल्लीत झालेल्या दहशतवादी घटनेबद्दल पंतप्रधान मेलोनी यांनी  सहसंवेदना व्यक्त केली आणि दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी भारतासोबत एकत्र कार्य करण्याच्या इटलीच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. या संदर्भात दोन्ही नेत्यांनी ' दहशतवादाला होणारा  वित्तपुरवठा थांबवण्यासाठीच्या भारत - इटली यांच्या संयुक्त पुढाकार उपक्रमाचा' स्वीकार केला. या उपक्रमाअंतर्गत दहशतवादाच्या विरोधातील लढ्यात द्विपक्षीय सहकार्य दृढ करणे आणि वित्तीय कृती कार्यदल आणि  दहशतवाद विरोधी जागतिक मंच यांच्यासह इतर जागतिक आणि बहुपक्षीय  मंचांवर एकत्र काम करणे असे उद्दिष्ट आहे.

दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण आणि नागरिकांमधील संबंध या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय भागीदारी दृढ करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नानांचा आढावा घेतला आणि त्याचे सकारात्मक मूल्यांकन केले.  संयुक्त धोरणात्मक कृती आराखडा 2025-29 च्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

यावर्षी नवी दिल्ली आणि ब्रेशिया येथे आयोजित केलेल्या दोन्ही व्यवसाय परिषदेचे नेत्यांनी स्वागत केले, या परिषदांमध्ये संबंधित उद्योगांचा मोठा सहभाग होता. उद्योग, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि गुंतवणूक या क्षेत्रात भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी सध्या सुरु असलेले प्रयत्न दोन्ही अर्थव्यवस्थांमधील स्पर्धात्मकता वाढवण्याबरोबरच लवचिक पुरवठा साखळी निर्मितीला पूरक असल्याचे दोन्ही   नेत्यांनी अधोरेखित केले.

इटलीच्या अंतराळ क्षेत्रातील प्रतिनिधींनी अलीकडेच भारताला दिलेल्या भेटीचे दोन्ही नेत्यांनी कौतुक केले, या भेटीमुळे सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही पातळ्यांवर या क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत  होण्यासाठी मार्ग खुला होईल अशी अपेक्षा आहे. 

परस्पर लाभदायी असलेल्या भारत - युरोपियन युनिअन मुक्त व्यापार कराराच्या अंतिम स्वरूपासाठी आणि 2026 मध्ये भारताने आयोजित केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रभाव परिषदेच्या यशासाठी इटलीचा भारताला मजबूत पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार मेलोनी यांनी केला.

या भेटीमुळे दोन्ही देशातील नियमित उच्च स्तरीय देवाणघेवाणीच्या परंपरेला पुन्हा बळकटी मिळाली. लोकशाही,कायद्याचे नियम आणि शाश्वत विकास या सामायिक मूल्यांचे समर्थन करण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय आणि बहुपक्षीय मंचावर व्यासपीठांवर सहकार्य दृढ करत एकत्र काम करण्यासाठी आणि परस्पर संवाद कायम राखण्यासाठी दोन्ही नेत्यांनी उत्सुकता दर्शविली.

 

* * *

आशिष सांगळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2193465) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , Kannada , Assamese , Gujarati , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Odia