iffi banner

इफ्फी 2025 दिवस 04: सर्जनशील मनांचा आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा संगम

#IFFIWood, 23 नोव्‍हेंबर 2025

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2025 च्या चौथ्या दिवशी जागतिक प्रतिभेचा ऊर्जस्वित संगम पाहायला मिळाला. सर्जनशील आव्हानांच्या रोमांचक टप्प्यांचा समारोप आणि प्रेरणादायी `मास्टरक्लासेस`यामुळे हा दिवस विशेष ठरला.

दिवसाची सुरुवात क्रीएटीव्ह माईंडज् आॅफ टुमारो अर्थात उद्याची सर्जनशील मने भविष्यातील सर्जनशील तरुणाई (सीएमओटी) च्या 48-तासांचे आव्हान याच्या भव्य समारोपाने झाली. तरुण चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या कलाकृती सादर करताना थकवा, समाधान आणि आनंद यांची मिश्र अभिव्यक्ती प्रेक्षकांना जाणवली.

पीआयबी माध्यम केंद्र हा दिवसभर इफ्फीचा धडधडता केंद्रबिंदू ठरला. येथे अनेक महत्त्वाच्या पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्या. ‘डे ताल पालो’ (इव्हान डेरीयल ओर्टीझ लॅंड्राॅन, जोस फेलीक्स गोमेझ) आणि ‘पाईक रिव्हर’ (राॅबर्ट सारकीज) या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी व कलाकारांनी त्यांच्या प्रभावी कथा मांडल्या. ‘सी साईड सेरेंडीपीटी’ (टोमोमी योशीमुरा) आणि ‘टायगर’ (आंशूल चौहान, कोसेई कुडो, मिना मोटेकी) यांच्या पथकांनी आशियाई सिनेमाची वाढती उपस्थिती अधोरेखित केली.

भारतीय प्रादेशिक चित्रपट आणि माहितीपटांनीही आपली चमक दाखवली. संदेश कडूर, परेश मोकाशी आणि देबांगकर बोर्गोहेन यांनी त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांबाबत अर्थात ‘निलगिरीज – अ शेअर्ड वाईल्डरनेस’, ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ आणि ‘सिकार’ माध्यमांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय कला सर्जनशीलताही मनमोहक ठरली, जिथे ख्रिस्टीना थेरेसा तोउर्नाटेझेस(कार्ला) आणि हायकवा चीए (रीनोईर) यांनी संयुक्त सत्रात त्यांच्या सर्जनशील प्रवासाबद्दल सांगितले.

चौथ्या दिवसाचा मुख्य आकर्षण ठरला, अत्यंत प्रतीक्षित मास्टरक्लास: ‘गिव्हींग अप इज नाॅट अ चाॅईस!’. दिग्गज अभिनेता आणि वक्ते अनुपम खेर यांनी कला अकादमी येथे प्रभावी आणि प्रेरणादायी भाषण करत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. चिकाटी आणि आवेश हे दिवसाचे मुख्य सूत्र त्यांच्या भाषणाने अधिक दृढ केले.

सीएमओटीच्या 48- तासांच्या आव्हानाचा समारोप

56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) 2025 मधील 48-तासांच्या क्रीएटीव्ह माईंडज् आॅफ टुमारो (सीएमओटी) आव्हानाचा समारोप आज 23 नोव्हेंबर 2025 रोजी गोवा येथील कला अकादमीमध्ये झाला.

पत्रकार परिषद: ‘डे ताल पालो’ आणि ‘पाईक रिव्हर’

‘डे ताल पालो’चे दिग्दर्शक इव्हान डॅरीयल ओर्टीझ लॅंड्राॅन, अभिनेता जोस फेलीक्स गोमेझ आणि ‘पाईक रिव्हर’ चे दिग्दर्शक राॅबर्ट सारकाईज यांनी 23 नोव्हेंबर 2025 रोजी पीआयबी माध्यम केंद्र येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये संवाद साधला.

'सीसाईड सेरेन्डिपिटी' आणि 'टायगर' या चित्रपटांची पत्रकार परिषद

'सीसाईड सेरेन्डिपिटी'चे कार्यकारी निर्माते तोमोमी योशिमुरा, तसेच 'टायगर'चे दिग्दर्शक अंशुल चौहान, अभिनेता कोसेई कुडो आणि निर्माती मीना मोटेकी यांनी 23 नोव्हेंबर 2025 रोजी पीआयबी मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींना संबोधित केले.

'सीसाईड सेरेन्डिपिटी'चे कार्यकारी निर्माते तोमोमी योशिमुरा, 'टायगर'चे दिग्दर्शक अंशुल चौहान, अभिनेता कोसेई कुडो आणि निर्माती मीना मोटेकी यांच्यासह 23 नोव्हेंबर 2025 रोजी पीआयबी मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान माध्यमांना संबोधित करताना.

पीआयबी मीडिया सेंटरमध्ये 23 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या 'सीसाईड सेरेन्डिपिटी' आणि 'टायगर' या चित्रपटांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींची एक झलक, जिथे दिग्दर्शक अंशुल चौहान आणि कार्यकारी निर्माती तोमोमी योशिमुरा यांनी माध्यमांशी संवाद साधला.

इफ्फी 2025 मध्ये, पीआयबी मीडिया सेंटर येथे 'निलगिरी - अ शेअर्ड वाइल्डरनेस', 'मुक्कम पोस्ट बोंबिलवाडी' आणि 'सिकार' या चित्रपटांची पत्रकार परिषद

इफ्फी 2025 मध्ये, पीआयबी मीडिया सेंटर येथे 'निलगिरी – अ शेअर्ड वाइल्डरनेस,' 'मुक्कम पोस्ट बोंबिलवाडी,' आणि 'सिकार' या चित्रपटांच्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक संदेश कदूर, परेश मोकाशी आणि देबांगकर बोरगोहेन यांनी माध्यम प्रतिनिधींना संबोधित केलेल्या क्षणांची झलक.

दिग्दर्शक संदेश कदूर, परेश मोकाशी आणि देबांगकर बोरगोहेन यांनी त्यांच्या चित्रपटासाठी इफ्फी 2025 मध्ये पीआयबी मीडिया सेंटर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांना संबोधित करतानाचे आणखी एक क्षणचित्र.

‘कार्ला’ आणि ‘रेनॉयर’ या चित्रपटांची पत्रकार परिषद

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 2025 मध्ये पीआयबी मीडिया सेंटर येथे त्यांच्या संबंधित चित्रपटांवरील संयुक्त पत्रकार परिषदेत दिग्दर्शक क्रिस्टीना थेरेसा टूर्नाट्झेस (कार्ला) आणि हायाकावा ची (रेनोइर) यांच्यासोबत पत्रकार परिषदेची झलक.

दिग्दर्शक क्रिस्टीना थेरेसा टूर्नाट्झेस (कार्ला) आणि हायाकावा चीए (रेनोइर) यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) 2025 मध्ये पीआयबी मीडिया सेंटर येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यमांना चित्रपटाबद्दल माहिती देतानाची आणखी एक झलक.

मास्टरक्लास: हार मानणे हा पर्याय नाही! (Giving Up is NOT a Choice!)

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) 2025 चौथ्या दिवशी कला अकादमीमध्ये जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या मार्गदर्शनात एक अत्यंत प्रेरणादायी मास्टरक्लास आयोजित करण्यात आला. "हार मानणे हा पर्याय नाही" या विषयावरील सत्र यावेळी झाले. या सत्रात अनुपम खैर यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीच्या जडणघडणीमागचे तत्त्वज्ञान आणि तंत्र उलगडणारा एक दुर्मिळ आणि जिव्हाळ्याचा संवाद साधला

23 नोव्हेंबर 2025 रोजी कला अकादमी इथे पार पडलेल्या 'हार मानणे हा पर्याय नाही' (Giving Up is NOT a Choice!) या विषयावरील मास्टरक्लास मध्ये उपस्थितांना संबोधित करताना जेष्ठ अभिनेते आणि वक्ते अनुपम खेर.

निमंत्रितांचे चर्चासत्र : स्वतंत्र सिनेमाच्या माध्यमातून एक जागतिक विधान

इफ्फी 2025 दरम्यान 23 नोव्हेंबर 2025 रोजी कला अकादमी इथे मीनाक्षी जयन, रजनी बसुमतारी, फौजिया फातिमा आणि रॅचेल ग्रिफिथ्स या वक्त्यांच्या सोबतीने स्वतंत्र सिनेमाच्या माध्यमातून एक जागतिक विदान या विषयावर आयोजित निमंत्रितांच्या चर्चासत्राची क्षणचित्रे

संवाद : लता मंगेशकर स्मृती चर्चा: 'द रिदम्स ऑफ इंडिया: फ्रॉम द हिमालयाज टू द डेक्कन'

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यान दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी गोव्यात पणजी इथे "द रिदम्स ऑफ इंडिया: फ्रॉम द हिमालयाज टू द डेक्कन" या संकल्पनेवर 'लता मंगेशकर स्मृती चर्चा' हे संवाद सत्र झाले. सुधीर श्रीनिवासन यांच्यासह विशाल भारद्वाज आणि बी. अजनीश लोकनाथ हे मान्यवर सहभागी झाले होते.

* * *

PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/शैलेश पाटील/आशिष सांगळे/नितीन गायकवाड/श्रद्धा मुखेडकर/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56

Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2025, #AnythingForFilms and #FilmsKeLiyeKuchBhi. Tag us @pib_goa on Instagram, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.

Release ID: 2193400   |   Visitor Counter: 12