पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी गौरव दिवसानिमित्त देवमोगरा माता मंदिरात दर्शन घेतले तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त राष्ट्राच्या कल्याणासाठी केली प्रार्थना
Posted On:
15 NOV 2025 3:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीला जोडून येणाऱ्या आदिवासी गौरव दिवसाच्या निमित्ताने देवमोगरा माता मंदिराला भेट दिली.
यावेळी पंतप्रधानांनी देवमोगरा मातेसमोर प्रार्थना केली तसेच सर्व नागरिकांच्या चांगल्या आरोग्य आणि प्रगतीसाठी आशीर्वाद मागितले. पंतप्रधान मोदी यांनी हा अनुभव पवित्र असल्याचे सांगितले. देशभरातील नागरिकांनीही या मंदिरात भेट देऊन देवीमातेचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात लिहिले आहे:
“देवमोगरा माता की जय!
आज आदिवासी गौरव दिवसाच्या दिनी, भगवान बिरसा मुंडा जी यांच्या 150 व्या जयंतीच्या पवित्र प्रसंगी देवमोगरा माता मंदिरात दर्शन करण्याचे सौभाग्य लाभले. देवी मातेकडे मी सर्व देशवासियांच्या उत्तम आरोग्याची आणि उन्नतीची कामना केली. माझा आग्रह आहे की आपणही या मंदिरात येऊन मातेचे दर्शन घ्यावे आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करावेत.”
“દેવમોગરા માતાની જય!
આજના જનજાતિય ગૌરવ દિવસ અને ભગવાન બિરસા મુંડાની દોઢસોમી જન્મજયંતિના પવિત્ર અવસરે દેવમોગરા માતાના મંદિરે દર્શન કરવાનું સૌભાગ્ય પ્રાપ્ત થયું.
સૌ દેશવાસીઓના સ્વાસ્થ્ય, કલ્યાણ અને ઉન્નતિ માટે પ્રાર્થના કરી.”
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190351)
Visitor Counter : 9