कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारकडून बियाणे विधेयक, 2025 च्या मसुद्यावर सार्वजनिक अभिप्राय नोंदवण्याचे अवाहन


भागधारक आपले अभिप्राय 11 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करू शकतात

Posted On: 13 NOV 2025 3:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 नोव्हेंबर 2025

 

भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने विद्यमान कृषी आणि नियामक गरजांशी सुसंगत असे बियाणे विधेयक, 2025 चा मसुदा तयार केला आहे. या प्रस्तावित विधेयकाद्वारे सध्या अस्तित्वात असलेले बियाणे अधिनियम, 1966 आणि बियाणे (नियंत्रण) आदेश, 1983 रद्द करून नवीन कायदा लागू करण्याचा उद्देश आहे.

बियाणे विधेयक, मसुदा 2025 चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे बाजारात उपलब्ध बियाणे आणि रोपवाटिका साहित्याच्या गुणवत्तेचे नियमन करणे, शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून देणे, बनावट व निकृष्ट बियाण्यांच्या विक्रीवर आळा घालणे, शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे, बियाणे आयात प्रक्रियेला उदारीकरण देऊन नवोन्मेष आणि जागतिक दर्जाच्या बियाण्यांचा प्रवेश वाढवणे तसेच बियाणे पुरवठा साखळीमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे हे आहे.

अंमलबजावणीच्या दृष्टीने, या विधेयकाच्या मसुद्यात किरकोळ उल्लंघनांवरील फौजदारी शिक्षेसंदर्भातील तरतुदी शिथिल करण्याचे आणि "इज ऑफ डुईंग बिझनेस- व्यवसाय सुलभता तसेच अनुपालनाचा बोजा कमी करण्याचे प्रस्ताव आहेत; तसेच, गंभीर उल्लंघनांवर प्रभावी कारवाईसाठी कठोर दंडात्मक तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत.

विधानमंडळपूर्व सल्लामसलत प्रक्रियेचा एक भाग म्हणून, बियाणे विधेयक, 2025 चा मसुदा आणि सूचना देण्यासाठीचे निर्धारित स्वरूप कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://agriwelfare.gov.in उपलब्ध आहे.

सर्व भागधाकांना आणि नागरिकांना या मसुदा विधेयकावर व त्यातील तरतुदींवर आपली मते नोंदवण्याचे अवाहन केले आहे. आपले अभिप्राय jsseeds-agri [at]gov[dot]in या ईमेल पत्त्यावर पाठवता येतील.

अभिप्राय एमएस वर्ड किंवा पीडीएफ स्वरूपात, शक्य तितक्या लवकर आणि 11 डिसेंबर 2025 पूर्वी सादर करावा.

 

Format of Comments and Suggestions

Name and Designation of the person

 

Contact Details

Address, E-mail, Mobile

 

Name of the Organisation/Agency (If any associated)

 

Contact Details

Address, E-mail, Mobile

 

Part-B Comments/ Suggestions

S. No.

 

Section

 

Issue

 

Comments /Suggestions

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

* * *

शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189657) Visitor Counter : 6