पंतप्रधान कार्यालय
भूतानचे चौथ्या राजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले, जागतिक शांततासंबंधी प्रार्थना महोत्सवात पंतप्रधानांचा सहभाग
Posted On:
12 NOV 2025 2:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या थिम्फू भेटीनिमित्त भूतानचे चौथे राजे, जिग्मे सिंग्ये वांगचुक यांनी त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधानांनी भूतानच्या चौथ्या राजांना त्यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी भारत सरकार तसेच भारतीय जनतेकडून त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्या.
भूतानचे चौथे राजे यांचे नेतृत्व, सल्ला आणि भारत-भूतान मैत्री अधिक घट्ट करण्यासंदर्भातील मार्गदर्शन याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांबद्दल चर्चा केली. या संदर्भात दोन्ही देशांतील जनतेला एकमेकांजवळ आणणारे सामायिक अध्यात्मिक तसेच सांस्कृतिक नाते त्यांनी अधोरेखित केले.
थिम्फू येथे सध्या सुरु असलेल्या जागतिक शांततासंबंधी प्रार्थना महोत्सवाचा भाग म्हणून चांगलिमिथांग क्रीडागारात आयोजित कालचक्र दीक्षा समारंभात भूतानचे चौथे राजे तसेच पंतप्रधान यांच्यासह पंतप्रधान मोदी सहभागी झाले. भूतानचे मुख्य मठाधीश द जे खेन्पो या प्रार्थना समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
* * *
हर्षल आकुडे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2189156)
Visitor Counter : 5