माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) 12 व्या बिग पिक्चर समिट-2025 मध्ये वेव्हज बझारच्या सहकार्याने जागतिक माध्यम आणि मनोरंजन गुंतवणूकदार मेळावा आयोजित करणार


सीआयआय आणि वेव्ह्ज बझार भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात संधीची नवी लाट आणणार

Posted On: 07 NOV 2025 4:10PM by PIB Mumbai

 

सीआयआय, अर्थात भारतीय उद्योग महासंघाने मुंबईत 1-2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या 12 व्या वार्षिक सीआयआय बिग पिक्चर समिटमध्ये ग्लोबल एम अँड ई मीट, अर्थात जागतिक माध्यम आणि मनोरंजन  गुंतवणूकदार बैठकीची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. वेव्हज (WAVES) बझारच्या सहयोगाने हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, विकासाच्या पुढील लाटेला चालना देण्यासाठी कंपन्या आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणून, भारताच्या माध्यम  आणि मनोरंजन (एम अँड ई) क्षेत्राच्या क्षमतेचा पूर्ण वापर करणे, हे याचे उद्दीष्ट आहे.

गुंतवणूकदार बैठकीसाठी सीआयआयने एलारा कॅपिटलला गुंतवणूक भागीदार म्हणून आणि विट्रिनाला जागतिक वित्तपुरवठा भागीदार म्हणून घोषित केले आहे. या बैठकी दरम्यान, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील बिझनेस नेटवर्किंग आणि प्रकल्पांसाठी आघाडीचे व्यासपीठ असलेले वेव्ह बझार, सीआयआय मार्केटप्लेसमध्ये आपले यशस्वी बी 2 बी मीटिंग फॉरमॅट आणि सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांचे आणि वेव्हज फिल्म बझारचे उपक्रम दर्शवणारे प्रोजेक्ट शोकेस समाविष्ट करेल. 

एआय युग: सर्जनशीलता आणि वाणिज्य क्षेत्राला जोडणारा सेतू’, या संकल्पनेवर आधारित सीआयआय बिग पिक्चर समिट, भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचा विकास आणि परिवर्तनासाठी पथदर्शी आराखडा तयार करण्यासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्रातील धुरिणांना  एकत्र आणेल. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी यांच्यासह जेट सिंथेसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन नवानी, यूट्यूब इंडियाच्या कंट्री मॅनेजिंग डायरेक्टर गुंजन सोनी (सीआयआय नॅशनल कौन्सिल ऑफ एम अँड ई चे पदाधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली  सीआयआय बिग पिक्चर समिटचे आयोजन करण्यात आले आहे.

सीआयआय माध्यम आणि मनोरंजन जागतिक गुंतवणूकदार परिषदेत आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष बैठकींच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतातील सर्वात आश्वासक उपक्रमांशी जोडले जातील. हा उपक्रम भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या एम अँड ई क्षेत्रात जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूकीला चालना देण्यासाठी सज्ज असून, यात चित्रपट, स्ट्रीमिंग, गेमिंग, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, लाईव्ह मनोरंजन यासह इतर गोष्टींचा समावेश आहे.

भारताच्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला समृद्ध इतिहास असूनही, तो मोठ्या प्रमाणात खासगी प्रोत्साहन आणि भांडवलाच्या बळावर भरभराटीला आला आहे. सीआयआयची गुंतवणूकदार बैठक, हे यामध्ये बदल घडवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे,” सीआयआय ग्लोबल मीडिया अँड ई इन्व्हेस्टर समिटचे अध्यक्ष, रिलायन्स एंटरटेनमेंटचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष, शिबाशीष सरकार म्हणाले. "प्रथमच, आम्ही जागतिक गुंतवणूकदार आणि भारतीय माध्यमे आणि मनोरंजन उद्योगांना थेट स्वरुपात आखलेल्या कार्यक्रमात एकत्र आणत आहोत. ही परिषद केवळ एक सामान्य प्रदर्शन नसून, भारतीय कंपन्यांना व्यवहार्य, आकर्षक गुंतवणूकीचे गंतव्य स्थान म्हणून प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने जगाशी जोडणारा कार्यक्रम आहे. ही एका प्रवासाची सुरुवात आहे, ” ते म्हणाले.

"एलारा कॅपिटलला सीआयआय मीडिया अँड ई ग्लोबल इन्व्हेस्टर समिटमध्ये भागीदारी करताना आनंद होत आहे. आम्ही माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूकदार समुदाय आणि कॉर्पोरेट्सना एकत्र आणण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यामुळे दोन्ही क्षेत्रांमध्ये सर्वोत्तम पद्धतीने समन्वय निर्माण होईल,” एलारा कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक हरेंद्र कुमार म्हणाले.

"या ऐतिहासिक उपक्रमात सीआयआय आणि एम अँड ई इन्व्हेस्टर मीट बरोबर भागीदारी करताना व्हिट्रिनाला अभिमान वाटत आहे," व्हिट्रिनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल फडणीस म्हणाले. "भारताची एम अँड ई परिसंस्था वेगाने विकसित होत आहे आणि जागतिक स्तरावर भारताची क्षमता प्रकाशात आणणे, आणि योग्य गुंतवणूकदारांना योग्य संधींशी जोडणे, हे आमचे ध्येय आहे," ते म्हणाले.

सीआयआय बिग पिक्चर समिट हे भारतातील माध्यम आणि मनोरंजन उद्योगाचे प्रमुख वार्षिक संमेलन असून, ते या क्षेत्राचा विकास आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील अग्रणी, गुंतवणूकदार आणि सर्जनशील क्षेत्रातील धुरिणांना एकत्र आणणे. या परिषदेचा एक भाग म्हणून, सीआयआय मार्केटप्लेस आणि वेव्हज बझार एकत्रितपणे विशेष बी 2 बी बैठका आयोजित करतील. या ठिकाणी सह-निर्मितीच्या संधींसाठी उद्योग क्षेत्रातील धुरीण, खरेदीदार, विक्रेते आणि सामग्री निर्माते एकत्र येतील.

या परिषदेत वेवेक्स (WAVEX) आणि वेव्हज (WAVES) क्रिएटोस्फीयर यांचाही सहभाग असेल. यामुळे स्टार्ट-अप सहयोग आणि व्यवसाय वाढीसाठी गतिशील वातावरण निर्माण होईल.

महत्वाच्या लिंक:

वेव्हज बझार: https://wavesbazaar.com/

***

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2187661) Visitor Counter : 4