पंतप्रधान कार्यालय
रोजगार मेळ्याअंतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर रोजी शासकीय विभाग आणि संस्थामध्ये नवनियुक्त तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रे वाटप करणार
प्रविष्टि तिथि:
28 OCT 2024 1:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता दूरदृश्य प्रणालीमार्फत शासकीय विभाग आणि संस्थामध्ये नवनियुक्त तरुणांना 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे वाटप करतील. पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधित ही करतील.
‘रोजगार मेळा’ रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची पंतप्रधानांची वचनबद्धता अधोरेखित करतो. या उपक्रमाद्वारे तरुणांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध होतील.
रोजगार मेळा देशभरातील 40 ठिकाणी आयोजित केला जाईल. मेळ्यातून महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इत्यादी विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये नव्याने नियुक्त कर्मचारी केंद्र सरकारमध्ये रुजू होतील.
नवनियुक्त कर्मचाऱ्यांना iGOT कर्मयोगी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या 'कर्मयोगी प्रारंभ' या ऑनलाइन मॉड्यूलद्वारे पायाभूत प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. या पोर्टलवर 1400 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम उपलब्ध आहेत जे नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या भूमिका प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करतील.
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2186346)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam