पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टी-30 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे केले अभिनंदन

Posted On: 29 JUN 2024 11:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 जून 2024

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले.

संपूर्ण देशाला संघाच्या कामगिरीचा अभिमान आहे, असे पंतप्रधानांनी समाज माध्यमावर सामायिक केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे. पंतप्रधानांनी भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले, तसेच आपल्या संघाने प्रत्येक सामना जिंकून ही स्पर्धा आणखी रोमहर्षक बनवली आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे :

"चॅम्पियन्स!

आपल्या संघाने दिमाखात टी-20 विश्वचषक घरी आणला!

आम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे.

हा सामना ऐतिहासिक होता.”

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2185903) अभ्यागत कक्ष : 27