पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय सशस्त्र पोलीस दले आणि राज्य पोलीस दले यांची कौशल्ये आणि ध्येयांचे दर्शन घडवणाऱ्या भव्य एकता संचलनाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
31 OCT 2025 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकता संचलन हे केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सीएपीएफ्स) आणि राज्य पोलीस दले यांना त्यांची कौशल्ये आणि ध्येयांचे प्रदर्शन करण्यासाठी मिळालेले मोठे निमित्त ठरले. मार्शल आर्ट्स आणि निःशस्त्र लढाऊ सरावांची महिला कर्मचाऱ्यांनी केलेली प्रभावी सादरीकरणे लक्षात घेत त्यांनी महिला शक्तीचा या संचलनामधील सहभाग देखील अधोरेखित केला.
‘एक्स’ समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“केंद्रीय सशस्त्र पोलीस दले (सीएपीएफ्स) आणि राज्य पोलीस दले यांना त्यांची कौशल्ये आणि ध्येयांचे प्रदर्शन करण्यासाठी एकता परेडच्या रूपाने मोठे निमित्त मिळाले. आपल्या महिला शक्तीचा चैतन्यपूर्ण सहभाग देखील तितकाच लक्षवेधी होता. महिला कर्मचाऱ्यांनी मार्शल आर्ट्स आणि निःशस्त्र लढाऊ सरावांची प्रभावी सादरीकरणे केली.”
* * *
सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184908)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada