पंतप्रधान कार्यालय
17 ऑक्टोबर रोजी, आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार सहभागी
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2024 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस आणि पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या समारंभात सहभागी होतील. या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
अभिधम्म दिवस भगवान बुद्धांनी अभी धम्माचे उपदेश केल्यानंतर स्वर्गलोकांतून पृथ्वीवर पुनरागमन केल्याची आठवण म्हणून साजरा केला जातो. नुकतेच इतर चार भाषांसह पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने या वर्षीच्या अभिधम्म दिवस उत्सवाचे महत्त्व वाढले आहे. कारण, भगवान बुद्धांचे अभिधम्म विषयक उपदेश मूळतः पाली भाषेत उपलब्ध आहेत.
भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिवस सोहळ्यात 14 देशांतील शिक्षणतज्ञ आणि भिक्षू सहभागी होतील, तसेच, भारतभरातील विविध विद्यापीठांमधील बुद्धधम्म विषयातील अनेक तरुण तज्ञ देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.
* * *
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2184550)
आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam