पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हरित हायड्रोजन इंधन सेल बस ही शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी अधिक हिरवे भविष्य घडवण्यासाठी आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे : पंतप्रधान

Posted On: 21 OCT 2024 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑक्‍टोबर 2024

 

भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांनी हरित हायड्रोजन इंधन सेल बसमध्ये प्रवास केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ही हरित हायड्रोजन बस, भारताच्या शाश्वतता  वाढवण्याच्या आणि पुढील पिढ्यांसाठी हरित भविष्य निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केलेल्या टिप्पणीला प्रतिसाद देताना पंतप्रधान म्हणाले:

“भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे यांनी हरित हायड्रोजन इंधन सेल बसमध्ये बसण्याचा अनुभव घेतल्याबद्दल मला आनंद झाला आहे.अशी बस म्हणजे शाश्वततेला चालना देण्यासाठी आणि पुढील पिढ्यांसाठी अधिक हरित भविष्य निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.” — @tsheringtobgay

 

* * *

नेहा कुलकर्णी /आशुतोष सावे/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184525) अभ्यागत कक्ष : 24