पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        'आरंभ 6.0' मध्ये पंतप्रधानांची तरुण सनदी अधिकाऱ्यांशी चर्चा
                    
                    
                        
नागरिकांसाठी जगण्याच्या सुलभतेत सुधारणा करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
                    
                
                
                    Posted On:
                30 OCT 2024 9:13PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2024
 
पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज 'आरंभ 6.0' या कार्यक्रमादरम्यान तरुण सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जन भागीदारीच्या भावनेतून प्रशासन कसे सुधारावे, यावर पंतप्रधानांनी या तरुण अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा केली.
सक्षम प्रतिसाद यंत्रणा आणि तक्रार निवारण प्रणालीत सुधारणा करण्याचे महत्त्वही पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तसेच, त्यांनी तरुण सनदी अधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी जगण्याच्या सुलभतेत सुधारणा करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधानांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करून या संवादाची माहिती दिली: "आरंभ 6.0 दरम्यान तरुण सनदी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जन भागीदारीच्या भावनेतून प्रशासन कसे सुधारायचे यावर आम्ही सखोल चर्चा केली. सक्षम प्रतिसाद यंत्रणा आणि तक्रार निवारण प्रणाली सुधारण्याचे महत्त्वही अधोरेखित केले. नागरिकांसाठी जगण्याच्या सुलभतेत सुधारणा करण्याचे आवाहन तरुण सनदी अधिकाऱ्यांना केले."
 
 
* * *
नेहा कुलकर्णी/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2183814)
                Visitor Counter : 6
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam