पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर रोजी मुंबईला भेट देणार
पंतप्रधान इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला करणार संबोधित आणि ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे भूषवणार अध्यक्षपद
इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये जागतिक सागरी केंद्र आणि नील अर्थव्यवस्थेमध्ये आघाडीचा देश म्हणून उदयाला येण्याचा भारताचा धोरणात्मक दृष्टिकोन प्रदर्शित केला जात आहे
इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये 85 हून अधिक देश आणि 1 लाखाहून अधिक प्रतिनिधी तसेच 350+ आंतरराष्ट्रीय वक्त्यांचा सहभाग
Posted On:
27 OCT 2025 11:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईला भेट देतील आणि सायंकाळी 4:00 च्या सुमारास ते नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला, संबोधित करतील तसेच ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षपद भूषवतील.
इंडिया मेरीटाईम वीक 2025 चा प्रमुख कार्यक्रम असलेल्या ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरम अर्थात जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी मंचामध्ये जागतिक सागरी कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रमुख गुंतवणूकदार, धोरणकर्ते, नवोन्मेषक आणि आंतरराष्ट्रीय भागीदार जागतिक सागरी परिसंस्थेच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र येतील. शाश्वत सागरी विकास , लवचिक पुरवठा साखळी, हरित नौवहन आणि समावेशक नील अर्थव्यवस्था धोरणांवर संवाद साधण्यासाठी हा मंच एक प्रमुख व्यासपीठ म्हणून काम करेल.
या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग सागरी अमृत काल व्हिजन 2047 शी सुसंगत असलेल्या महत्त्वाकांक्षी, भविष्याभिमुख सागरी परिवर्तनासाठी त्यांची दृढ वचनबद्धता दर्शवितो. बंदर-केंद्रित विकास, शिपिंग त्याचबरोबर जहाज बांधणी, निर्बाध वाहतूक व्यवस्था प्रणाली आणि सागरी कौशल्य-निर्मिती या चार धोरणात्मक स्तंभांवर उभा असलेला हा दीर्घकालीन दृष्टीकोन भारताला जगातील आघाडीच्या सागरी शक्तींमध्ये समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे. ‘इंडिया मेरीटाईम वीक 2025 या दृष्टिकोनाचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करण्यासाठी, शिपिंग, बंदरे, जहाजबांधणी, क्रूझ पर्यटन आणि नील अर्थव्यवस्था, अशा क्षेत्रातील आघाडीच्या भागधारकांना एकत्र आणणारे सरकारचे प्रमुख जागतिक व्यासपीठ म्हणून काम करते.
27 ते 31 ऑक्टोबर, 2025 दरम्यान "एकात्म महासागर, एक सागरी दृष्टीकोन " या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येणारा, आयएमडब्ल्यू 2025 हा जागतिक सागरी केंद्र आणि नील अर्थव्यवस्थेमध्ये आघाडीचा देश म्हणून उदयास येण्यासाठी भारताचा धोरणात्मक पथदर्शी कार्यक्रम प्रदर्शित करेल. आयएमडब्ल्यू 2025 मध्ये 85 हून अधिक देश सहभागी होतील, त्यामध्ये एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, 500 पेक्षा जास्त प्रदर्शक आणि 350 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय वक्ते सहभागी होतील.
निलीमा चितळे/सुषमा काणे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183168)
Visitor Counter : 45
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam