पंतप्रधान कार्यालय
तिसऱ्या वीर बाल दिवसानिमित्त 17व्या बाल पुरस्कार विजेत्यांशी पंतप्रधानांनी केलेल्या संभाषणाचा मजकूर
Posted On:
26 DEC 2024 10:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024
पुरस्कार विजेते- मी तीन पुस्तके लिहिली आहेत. पुस्तके लिहिण्याचे माझे मुख्य कारण म्हणजे मला वाचनाची आवड आहे. मला स्वतः एक दुर्मिळ आजार आहे आणि जगण्यासाठी २ वर्षांचा कालावधी माझ्या हातात आहे. परंतु माझी आई, बहिण, माझी शाळा,..... आणि ज्या व्यासपीठावर मी माझी पुस्तके प्रकाशित केली आहेत त्यांच्या मदतीने मी आज हे सर्व साध्य करू शकलो आहे.
पंतप्रधान- तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली?
पुरस्कार विजेते- मला वाटतं की, माझ्या इंग्रजी शिक्षकांकडून असेल.
पंतप्रधान- आता, तुम्ही इतरांना प्रेरणा देत आहात. तुमचे पुस्तक वाचल्यानंतर वाचक तुम्हांला काही संदेश लिहितात का?
पुरस्कार विजेते- हो
पंतप्रधान- तुम्हाला कोणत्या प्रकारचे संदेश मिळत आहेत?
पुरस्कार विजेते- सर्वात मोठा संदेश म्हणाल तर, लोकांनी स्वतःची पुस्तके लिहायला सुरुवात केली आहे.
पंतप्रधान- तुम्ही कुठे केले?, तुम्ही प्रशिक्षण कुठे घेतले?, ते कसे घेतले?
पुरस्कार विजेते- कुठलेही औपचारिक प्रशिक्षण घेतले नाही.
पंतप्रधान- कुठलेही नाही, आणि तुम्हाला हे करावसं वाटलं?
पुरस्कार विजेते- हो, सर.
पंतप्रधान- तुम्ही इतर कोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेता?
पुरस्कार विजेते- मी इंग्रजी, उर्दू आणि काश्मिरी स्पर्धांमध्ये भाग घेतो.
पंतप्रधान- तुमचे यु-ट्यूबवर चॅनेल आहे का, किंवा तुम्ही कुठे सादरीकरण करता का?
पुरस्कार विजेते- हो सर, मी युट्यूब वापरतो. आणि युट्यूब वर सादरीकरण देखील करतो.
पंतप्रधान- तुमच्या कुटुंबात कोणी गाणी गातं का?
पुरस्कार विजेते- नाही सर, कोणी नाही.
पंतप्रधान- तुम्ही ते सुरु केले.
पुरस्कार विजेते- हो सर.
पंतप्रधान- तुम्ही काय करता? तुम्ही बुद्धिबळ खेळता का?
पुरस्कार विजेते- हो सर.
पंतप्रधान- तुम्हाला बुद्धिबळ खेळायला कोणी शिकवले?
पुरस्कार विजेते- माझे वडील आणि युट्यूब.
पंतप्रधान- अच्छा!
पुरस्कार विजेते- आणि माझ्या शिक्षकांनी देखील.
पंतप्रधान- दिल्लीत खरोखरचं खूप खंडी आहे.
पुरस्कार विजेते- या वर्षी, कारगिल विजय दिवसाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, मी कारगिल युद्ध स्मारकापासून राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत 1251 किलोमीटर सायकलने प्रवास केला. आणि दोन वर्षांपूर्वी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त, मी महिरंग येथील आयएनए स्मारकापासून नवी दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत सायकलने प्रवास केला.
पंतप्रधान- प्रत्येक प्रवासादरम्यान, तुम्ही किती दिवस खर्च केले?
पुरस्कार विजेते- पहिल्या प्रवासासाठी मी 32 दिवस सायकलने प्रवास केला. 2612 किलोमीटर अंतर कापले. आणि दुसऱ्या प्रवासासाठी मला 13 दिवस लागले.
पंतप्रधान- तुम्ही एका दिवसात किती अंतर कापू शकता?
पुरस्कार विजेते- दोन्ही प्रवासांमध्ये, मी एका दिवसात जास्तीत जास्त 129.5 किलोमीटर सायकल चालवली.
पुरस्कार विजेते – नमस्ते, सर.
पंतप्रधान – नमस्ते.
पुरस्कार विजेते – मी दोन आंतरराष्ट्रीय विक्रम साध्य केले आहेत. पहिला एका मिनिटात ३१ अर्ध-शास्त्रीय श्लोक पठण आणि दुसरा एका मिनिटात १३ संस्कृत श्लोक पठण करण्याचा होता.
पंतप्रधान – तुम्ही हे सर्व कुठून शिकलात?
पुरस्कार विजेते – सर, मी हे युट्यूब वरून शिकलो.
पंतप्रधान – ठीक आहे. , तुम्ही काय करता ते मला फक्त एका मिनिटात दाखवा.
पुरस्कार विजेते – ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्। (संस्कृतमध्ये)
पुरस्कार विजेते – नमस्ते, सर.
पंतप्रधान – नमस्ते.
पुरस्कार विजेते – मी राष्ट्रीय स्तरावर ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकले.
पंतप्रधान – ते सर्वजण तुम्हाला घाबरत असतील. तुम्ही कुठून शिकलात? शाळेतून शिकलात का?.
पुरस्कार विजेते – नाही, सर, मी माझ्या अॅक्टिव्हिटी कोचकडून शिकलो.
पंतप्रधान – फारचं छान, तुम्ही पुढे काय ध्येय ठेवले आहे?
पुरस्कार विजेते – मी ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाला गौरव मिळवून देण्याची माझी इच्छा आहे.
पंतप्रधान – व्वा, म्हणजे तुम्ही कठोर परिश्रम करत आहात.
पुरस्कार विजेते – हो.
पंतप्रधान- तुमचे खूप हॅकर क्लब आहेत.
पुरस्कार विजेते - हो, आम्ही सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये कायद्याची अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण देत आहोत आणि 5000 मुलांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. आम्हाला असे मॉडेल्स अंमलात आणायचे आहेत जे समाजाची सेवा करू शकतील आणि त्याच वेळी, आमचे हित देखील साध्य होईल.
पंतप्रधान - तुमचा प्रार्थना प्रकल्प कसा सुरु आहे?
पुरस्कार विजेते - प्रार्थना प्रकल्प अजूनही विकासाच्या टप्प्यावर आहे! काही संशोधन आवश्यक आहे कारण आम्हाला वेदांचे भाषांतर डच आणि इतर काही जटिल भाषांमध्ये करायचे आहे.
पुरस्कार विजेते -याव्यतिरिक्त, मी पार्किन्सन आजार असलेल्या व्यक्तींसाठी एक स्वयं-स्थिर चमचा विकसित केला आहे आणि मेंदूच्या वयाचा अंदाज देणारे एक मॉडेल देखील आम्ही तयार केले आहे.
पंतप्रधान - तुम्ही त्यावर किती वर्षे काम केले आहे?
पुरस्कार विजेते – सर, मी दोन वर्षे काम केले आहे.
पंतप्रधान – तुम्ही पुढे काय करणार आहात?
पुरस्कार विजेते– सर, मला आणखी संशोधन करायचे आहे.
पंतप्रधान – तुम्ही कुठून आहात?
पुरस्कार विजेते – सर, मी बंगळुरूचा आहे, माझी हिंदी फारशी चांगली नाही.
पंतप्रधान – खूप चांगली आहे, माझ्यापेक्षाही चांगली आहे.
पुरस्कार विजेते – धन्यवाद, सर.
पुरस्कार विजेते – मी कर्नाटक संगीत आणि संस्कृत श्लोकांच्या मिश्रणासह हरिकथेचे सादरीकरण करतो.
पंतप्रधान – तर, तुम्ही किती हरि कथा सादर केल्या आहेत?
पुरस्कार विजेते – मी जवळजवळ शंभर सादरीकरणे केली आहेत.
पंतप्रधान - खूप छान.
पुरस्कार विजेते - गेल्या दोन वर्षांत, मी पाच वेगवेगळ्या देशांमधील पाच सर्वोच्च शिखरे सर केली आहेत. आणि प्रत्येक शिखरावर भारताचा ध्वज फडकवला आहे. जेव्हा मी दुसऱ्या देशात जातो आणि लोकांना कळते की मी भारतातून आलो आहे, तेव्हा ते मला अपार प्रेम आणि आदर मिळाला आहे.
पंतप्रधान – जेव्हा लोक तुम्हाला भेटतात आणि तुम्ही भारताचे आहात हे कळते तेव्हा ते काय म्हणतात?
पुरस्कार विजेते – ते मला खूप प्रेम आणि आदर देतात आणि माझ्या पर्वत चढाईमागील मुख्य उद्देश म्हणजे मुलींचे सक्षमीकरण आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे.
पुरस्कार विजेते – मी कलात्मक रोलर स्केटिंग करते. या वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेल्या रोलर स्केटिंगमध्ये मी एक आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकले आणि मला ६ राष्ट्रीय पदके मिळाली.
पुरस्कार विजेते – मी एक पॅरा-अॅथलीट आहे, सर, आणि या महिन्यात, 1 ते 7 डिसेंबर दरम्यान, मी थायलंडमध्ये झालेल्या पॅरा स्पोर्ट युवा स्पर्धेत भाग घेतला. आम्ही तिथे सुवर्णपदके जिंकून आपल्या देशाचे नाव उंचावले आहे.
पंतप्रधान – व्वा.
पुरस्कार विजेते – या वर्षी, मी युवा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्या स्पर्धेत, मी ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले, ७६ किलो वजनी गटात जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्यातही सुवर्णपदक जिंकले मी संपूर्ण स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
पंतप्रधान – तुम्ही तर सर्व पदके मिळवत आहात!
पुरस्कार विजेते - नाही, सर.
पुरस्कार विजेते - एकदा एका फ्लॅटला आग लागली आणि कोणालाही आग लागली आहे हे माहित नव्हते. घरातून येणाऱ्या धुराकडे माझे लक्ष गेले. कोणीही घरात जाण्याचे धाडस केले नाही कारण सर्वांना भीती वाटत होती की ते भाजतील. त्यांनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, मी वेडा आहे आणि जर मी आत गेलो तर मरेन असे ते म्हणाले. पण मी धाडस करत आत जाऊन आग विझवली.
पंतप्रधान - तुम्ही अनेकांचे जीव वाचवले का?
पुरस्कार विजेते- त्या अपार्टमेंटमध्ये 70 घरे आणि 200 कुटुंबे होती.
पंतप्रधान - तुम्ही पोहता का?
पुरस्कार विजेते - हो.
पंतप्रधान - तर, तुम्ही सर्वांना वाचवले?
पुरस्कार विजेते- हो.
पंतप्रधान - तुम्हाला भीती वाटली नाही का?
पुरस्कार विजेते - नाही.
पंतप्रधान - हे सर्व संपल्यानंतर, तुम्ही काहीतरी चांगले काम केले आहे हे जाणून तुम्हाला बरे वाटले का?
पुरस्कार विजेते - हो.
पंतप्रधान - शाब्बास !
* * *
जयदेवी पुजारी-स्वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183145)
अभ्यागत कक्ष : 13
Read this releasein:
Tamil
,
Kannada
,
Assamese
,
Manipuri
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam