पंतप्रधान कार्यालय
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
भारताच्या सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या निधनाबद्दल देश शोक व्यक्त करत आहे: पंतप्रधान
त्यांनी अर्थमंत्रीपदासह विविध सरकारी पदांवर काम केले आणि गेल्या काही वर्षांत आपल्या आर्थिक धोरणावर एक मजबूत छाप सोडली आहे: पंतप्रधान
आपले पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले: पंतप्रधान
Posted On:
26 DEC 2024 11:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2024
पंतप्रधान, श्री. नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "भारत त्यांच्या सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो," असे श्री. मोदी म्हणाले. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी म्हणाले की सामान्य पार्श्वभूमीत जन्मलेले डॉ. मनमोहन सिंग एक आदरणीय अर्थशास्त्रज्ञ बनले. आपले पंतप्रधान म्हणून, डॉ. मनमोहन सिंग यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.
पंतप्रधानांनी एक्स मंचावर एक पोस्ट केली आहे:
भारत त्यांच्या सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एक, डॉ. मनमोहन सिंग जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. सामान्य कुटुंबातून जन्मलेले ते एक आदरणीय अर्थशास्त्रज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्रीपदासह विविध सरकारी पदांवर काम केले आणि वर्षानुवर्षे आपल्या आर्थिक धोरणावर एक मजबूत छाप सोडली. संसदेतील त्यांचे हस्तक्षेपही व्यावहारिक होते. आपले पंतप्रधान म्हणून त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.
“डॉ. मनमोहन सिंग जी पंतप्रधान असताना आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना त्यांच्याशी माझे नियमित संभाषण होत असे. प्रशासनासंबंधित विविध विषयांवर आमची व्यापक चर्चा होत असे. त्यांची बुद्धिमत्ता आणि नम्रता नेहमीच दिसून येत असे.
या दुःखद प्रसंगी, डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबाप्रती, त्यांच्या मित्रांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती माझी संवेदना. ओम शांती.”
* * *
जयदेवी पुजारी-स्वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183124)
अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein:
Odia
,
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam