पंतप्रधान कार्यालय
'मन की बात'च्या 127 व्या भागातील काही अंश पंतप्रधानांनी केले सामायिक
Posted On:
26 OCT 2025 9:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'च्या 127 व्या भागातील काही महत्त्वाचे अंश सामायिक केले.
X समाजमाध्यमावर केलेल्या वेगवेगळ्या टिप्पण्यांमध्ये मोदी म्हणतात:
"छठचा महासण, संस्कृती, निसर्ग आणि सामाजिक एकतेचे प्रतिबिंब आहे. माझे आवाहन आहे की, आपण देश-परदेशात कुठेही असाल, संधी मिळाल्यास 'छठ'च्या उत्सवात सहभागी व्हा आणि या अनोख्या अनुभवाचा आनंद घ्या.
#MannKiBaat"
"छत्तीसगढमधील अंबिकापूर येथे प्लास्टिक कचरा साफ करण्याचा अनोखा उपक्रम असो, किंवा बंगळूरुमधील विहिरी आणि तलावांचे पुनरुज्जीवन करण्याची मोहीम असो….,..जर आपण मनापासून ठरवले तर कोणताही बदल करणे कठीण नाही…..हे सिद्ध करणारी ही प्रेरणादायक उदाहरणे आहेत.
#MannKiBaat"
"'वंदे मातरम्'मध्ये भरलेली विलक्षण भावना आपल्याला, मातृभूमीची लेकरे म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देते. 7 नोव्हेंबरला आपण 'वंदे मातरम्'च्या 150 व्या वर्षाच्या उत्सवाचा प्रारंभ करू, ज्याबद्दल माझे देशवासियांना हे विशेष आवाहन आहे...
#VandeMatram150
#MannKiBaat"
"आपल्या संस्कृतीतून आणि समाजमाध्यमांच्या जगतातून आज संस्कृतला एक नवसंजीवनी मिळत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. या दिशेने आपले अनेक युवा-मित्र ज्या प्रकारचे मनोरंजक प्रयत्न करत आहेत, ते खूप प्रेरणादायक आहेत.
#MannKiBaat"
"भारतीय श्वान प्रजातींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून, त्यांच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांना महत्त्वाच्या मोहिमांमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी सीमा सुरक्षा दल-BSF आणि केंद्रीय राखीव पोलीस दल-CRPF ने केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
@BSF_India
@crpfindia
#MannKiBaat"
"यंदाचा 31 ऑक्टोबर विशेष असेल, कारण आपण सरदार पटेल यांची 150 वी जयंती साजरी करणार आहोत. मी तुम्हा सर्वांना, विशेषतः माझ्या तरुण मित्रांना, देशभरातील 'Run For Unity' या एकता दौडीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करतो.
#MannKiBaat"
"कोरापुटची कॉफी खूप चवदार आहे. ती ओडिशासाठी अभिमानास्पद आहे!
#MannKiBaat"
"भारताची कॉफी म्हणजे सर्वोत्तम दर्जाची कॉफी.
ती भारतात तयार होते आणि जगाला आवडते!
#MannKiBaat"
“କୋରାପୁଟ କଫି ଅତ୍ୟନ୍ତ ସୁସ୍ୱାଦୁ। ଏହା ଓଡ଼ିଶାର ଗୌରବ।
#MannKiBaat”
“ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಸುಸ್ಥಿರ ಜೀವನವನ್ನು ಮತ್ತಷ್ಟು ಹೆಚ್ಚಿಸುವ ಶ್ಲಾಘನೀಯ ಪ್ರಯತ್ನದ ಪ್ರಮುಖಾಂಶಗಳು.
#MannKiBaat”
“छठ महापर्व संस्कृति, प्रकृति आरो सामाजिक एकता केरो प्रतिबिंब छेकै। हमरो आग्रह छै कि तोहं देश- दुनिया म कहीं भी रहो, मौका मिलैय त छठ के उत्सव म शामिल होय क एकरो अनूठा अनुभव के आनंद जरूर ल।
#MannKiBaat”
“छठ महापर्व संस्कृति , प्रकृति आऊर सामाजिक एकता के प्रतिबिम्ब बा । हमर आग्रह बा कि रऊआ लोगन देश-दुनिया में कहीं भी रही आ जब भी मौक़ा मिले त छठ के उत्सव में शामिल होके एकर अनूठा अनुभव के आनंद ज़रूर ली।
#MannKiBaat”
“छठि महापर्व संस्कृति, प्रकृति ओ सामाजिक एकताक प्रतिबिंब थिक। हमर आग्रह अछि जे अपने देश-दुनिया मे कतहु होइ, अवसर भेटय तऽ छठिक उत्सव मे सम्मिलित भऽकऽ एकर अनुपम अनुभवक आनंद अवश्य ली।
#MannKiBaat”
"थायलंडच्या राजमाता महाराणी सिरिकित यांच्या निधनाने मला खूप दुःख झाले आहे. सार्वजनिक सेवेसाठी त्यांनी केलेले आजीवन समर्पण पिढ्यानपिढ्या प्रेरणा देत राहील. या दुःखद प्रसंगी मी महाराज, राजघराण्यातील सदस्य आणि थायलंडच्या लोकांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो."
“एषः अतीव मोदावहः यत् अस्माकं संस्कृतेः माध्यमेन सामाजिकसञ्जालपटलानां च माध्यमेन संस्कृतं साम्प्रतं किञ्चन नवं प्राणवायुं प्राप्नोति। एतस्यां दिशि अस्माकं युवानः यथाविधान् रोचकप्रयासान् समाचरन्ति, तेषां प्रयासाः अतीव प्रेरणाप्रदायकाः सन्ति।
#MannKiBaat”
"शूर कोमरम भीम यांना आदरांजली वाहिली आणि वसाहतवादी शासक तसेच जुलमी निजामाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी केलेल्या भरीव प्रयत्नांचे स्मरण केले.
#MannKiBaat"
“సాహసవీరుడైన కొమరం భీమ్కు నివాళులర్పించి, వలస పాలకులకు, నిరంకుశుడైన నిజాంకు వ్యతిరేకంగా ఆయన చేసిన పోరాటాన్ని స్మరించుకున్నాను.
#MannKiBaat”
"15 नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आहे. हा दिवस आपण आदिवासी (जनजातीय) गौरव दिवस म्हणून साजरा करतो. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांचा संघर्ष आणि धैर्य प्रत्येक पिढीला प्रेरित करत राहील.
#MannKiBaat"
* * *
सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2182726)
Visitor Counter : 10