पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'सबकी योजना, सबका विकास' या विषयावरील  सार्वजनिक सेवा जनजागृतीपर चित्रपटाच्या  राष्ट्रव्यापी प्रदर्शनाला आजपासून प्रारंभ

Posted On: 24 OCT 2025 10:12AM by PIB Mumbai

 

जनहित योजनांबद्दल माहिती देणारा  'सबकी योजना, सबका विकास' हा  दोन मिनिटांचा सार्वजनिक सेवा जनजागृतीपर चित्रपट आजपासून म्हणजेच 24 ऑक्टोबर पासून 6 नोव्हेंबर पर्यंत देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनभागीदारी आणि केंद्र सरकारी योजनांचा लाभ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या संकल्पनेशी सुसंगत ही मोहीम आर्थिक वर्ष 2026–27 साठी पंचायत विकास योजना आखण्यात लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यावर आणि जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.

तळागाळात विकासाचा अजेंडा राबवण्यात प्रत्येक नागरिकांची भूमिका महत्त्वाची असते यावर हा संदेश भर देतो. हा लघुपट सार्वजनिक सेवा जागरूकता चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार असून सध्या आदर्श आचारसंहिता लागू असलेल्या राज्यांमध्ये तो प्रदर्शित केला जाणार नाही. हा लघुपट मुख्य चित्रपट सुरु होण्यापूर्वी आणि मध्यंतराच्या पाच मिनिटांच्या कालावधीत दाखवला जाणार आहे.

देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  सार्वजनिक सेवा मोहीम  2025–26 ला  2 ऑक्टोबर  2025 रोजी सुरुवात झाली. या माध्यमातून पंचायत समित्यांना पुराव्यावर आधारित आणि सर्वसमावेशक पंचायत विकास योजना तयार करणे शक्य होणार असून त्यातून स्थानिक प्राधान्यांना अधोरेखित करतानाच विशेष ग्राम सभा बैठकांच्या आयोजनातून राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वाटचाल करण्याचा उद्देश आहे. वर्ष 2018 मध्ये सार्वजनिक सेवा मोहीम - “सबकी योजना, सबका विकास”अभियानाची सुरुवात झाल्यापासूनच ही योजना एक प्रमुख उपक्रम बनली असून तळागाळात लोकशाही बळकट करण्यात, लोकसहभागातून नियोजनाला  संस्थात्मक स्वरूप बहाल करण्यात आणि संपूर्ण भारतात स्वयंशासनाचा पाया मजबूत करण्यात या उपक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ईग्रामस्वराज पोर्टलनुसार, 2019–20 पासून ग्रामपंचायत विकास योजना (GPDPs), ब्लॉक पंचायत विकास योजना (BPDPs) आणि जिल्हा पंचायत विकास योजना (DPDPs) यांचा समावेश असलेल्या 18.13 लाखांहून अधिक पंचायत विकास योजना अपलोड करण्यात आल्या आहेत, यात 2025–26 च्या चालू हंगामातील 2.52 लाख योजनांचा समावेश आहे.

देशभरातील चित्रपटगृहांमध्ये लोकांसाठीच्या योजना अभियानावरील  या सार्वजनिक जनजागृती लघुपटाचे प्रदर्शन करून, नागरिकांचा पंचायत राज संस्थांशी सहभाग वाढवणेआणि स्थानिक प्रशासन तसेच  ग्रामीण विकासात सक्रिय सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रेरित करणे हा मंत्रालयाचा उद्देश आहे.

लघुपट पाहण्यासाठी खाली क्लिक करा :

https://drive.google.com/file/d/1udnbqnCI6C9nc03QuRfLfsaaBdR0S4Lt/view?usp=sharing

***

नेहा कुलकर्णी / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2182064) Visitor Counter : 14