पंतप्रधान कार्यालय
आयएनएस विक्रांतवर साजऱ्या केलेल्या दिवाळी क्षणांची झलक पंतप्रधानांकडून सामाईक
Posted On:
21 OCT 2025 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
भारतीय नौदलासमवेत आयएनएस विक्रांतवर साजऱ्या केलेल्या दिवाळी क्षणांची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाईक केली. मोदींनी, एका बाजूला विशाल महासागर आणि दुसऱ्या बाजूला भारतमातेच्या शूर सैनिकांची अफाट ताकद असल्याचे अधोरेखित करत हा दिवस, एक उल्लेखनीय दिवस, एक उल्लेखनीय क्षण आणि उल्लेखनीय दृश्य असल्याचे नमूद केले. एका बाजूला अनंत क्षितिज आणि अमर्याद आकाश आहे तर दुसऱ्या बाजूला अनंत शक्तीचे प्रतीक असलेली आयएनएस विक्रांतची प्रचंड ताकद असल्याचं त्यांनी नमूद केले. समुद्रावरील सूर्यप्रकाशाचे किरण दीपावलीच्या वेळी शूर सैनिकांनी प्रज्वलित केलेल्या दिव्यांशी मेळ राखत आहेत, जणू दिव्यांची दिव्य माळच तयार होते आहे, असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. भारतीय नौदलातील शूर जवानांसमवेत दिवाळी साजरी करणे हा त्यांना मिळालेला मान आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
एक्स या समाजमाध्यमांवरून लिहिलेल्या संदेशसाखळीमध्ये मोदी नमूद करतातः
"आपल्या शूर नौदल सैनिकांसमवेत आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी करत आहे."
"आपल्या कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करणे लोकांना आवडते आणि मलाही, त्यामुळेच प्रत्येक वर्षी मी आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना आणि सुरक्षा दलांना भेटतो. गोवा आणि कारवारजवळ पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या भारतीय नौदलाच्या जहाजावर आयएनएस विक्रांतवर आपल्या शूर नौदल कर्मचाऱ्यांसमवेत असल्याचा मला आनंद वाटतो आहे."
"आयएनएस विक्रांतवरील काही ठळक घडामोडी, एअर पॉवर डेमो, उत्साहवर्धक सांस्कृतिक कार्यक्रम आणि बरेच काही"
"आयएनएस विक्रांतच्या फ्लाईटडेकवर , मिग-29 लढाऊ विमानासह"
"आयएनएस विक्रांतवरील अचूकता आणि विलक्षण कौशल्याचे अद्भूत हवाई ताकदीचे प्रात्यक्षिक पाहिले. दिवसा आणि रात्रीच्या अंधारातही एका लहान धावपट्टीवरून मिग-29 लढाऊ विमानांचे उड्डाण आणि जमिनीवर उतरणे हे कौशल्य, शिस्त आणि तांत्रिक कुशलतेचे चित्तथरारक प्रदर्शन होते."
"बारा खाना हा सशस्त्र दलांच्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. काल संध्याकाळी नौदल कर्मचाऱ्यांसह आयएनएस विक्रांतवर बारा खानामध्ये सहभागी झालो."
"आयएनएस विक्रांत हा भारताचा अभिमान आहे!"
"ही सर्वांत मोठी स्वदेशी बनावटीची युद्धनौका आहे. कोची येथे झालेल्या कार्यक्रमाची मला आठवण येते जेव्हा ही युद्धनौका दाखल झाली होती आणि आज, मला इथे दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली. "
"काल संध्याकाळी आयएनएस विक्रांतवर साजऱ्या झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आठवणी जपून ठेवेन. नौदल कर्मचारी खरोखरच सर्जनशील आणि अष्टपैलू आहेत. त्यांनी लिहिलेले 'कसम सिंदूर की' हे गीत माझ्या स्मरणात सदैव राहील."
"आयएनएस विक्रांत येथील हवाई सामर्थ्य प्रात्यक्षिकातून"
"आयएनएस विक्रांतवरील योगअभ्यास!"
भारताची प्रतिष्ठा असलेल्या आयएनएस विक्रांतवरील, शूर नौदल जवानांना योग सत्रात सामील होताना पाहून आनंद झाला.
आपल्याला एकत्र ठेवणे आणि आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य बळकट करण्याचे काम योग करत राहो.
"आपणा सर्वांप्रमाणे मलाही कुटुंबियांसमवेत दिवाळी साजरी करायला आवडते. म्हणूनच, या मंगलप्रसंगी, देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत सैनिक आणि सुरक्षा दलांच्या जवानांना मी भेटतो. यावेळी गोवा आणि कारवार जवळ पश्चिम समुद्र सीमेवर असलेल्या आपल्या प्रमुख आयएनएस विक्रांतवर हे सौभाग्य मला प्राप्त झाले. आपल्या शूर नौदल सैनिकांसमवेत मिळालेली ही संधी मला नवी उर्जा आणि नवा उत्साह प्रदान करते."
"आयएनएस विक्रांत भारताचा अभिमान आहे."
"ही भारताची सर्वांत मोठी स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार झालेली युद्धनौका आहे. कोची येथे झालेला समारंभ मला आठवतो, तेव्हा ही युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती. आज दिवाळीच्या मंगल प्रसंगी इथे येण्याचा सन्मान मला मिळाला."
"काल संध्याकाळी आयएनएस विक्रांतवर अविस्मरणीय सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. आपले नौसैनिक प्रतिभावान आणि शूर आहेत. तसेच सर्जनशीलही आहेत. त्यांनी लिहिलेले 'कसम सिंदूर की' हे गीत माझ्या कायम स्मरणात राहील. "
"आजच्या स्टीमपास्टमध्ये सहभागी झालेल्या युद्धनौकांमध्ये आयएनएस विक्रांत (आढावा मंच) आयएनएस विक्रमादित्य (मी दहा वर्षांपुर्वी संयुक्त कमांडर्स परिषदेसाठी आलो होतो), आयएनएस सुरत (या वर्षी सुरवातीला मुंबईत जे सेवेत दाखल झाली होती ) आयएनएस मुरगांव , आयएनएस चेन्नई (फ्रान्समध्ये 2023 मध्ये बॅस्टिल डे समारंभामध्ये सहभागी होती), आयएनएस इंफाळ( जी यावर्षीच्या मॉरीशस राष्ट्रीय दिन समारंभात सहभागी झाली होती ) आयएनएस कोलकाता, आयएनएस तुशील, आयएनएस तबर, आयएनएस तेग, आयएनएस बेतवा, आयएनएस दीपक आणि आयएनएस आदित्य यांचा समावेश होता."
“आयएनएस विक्रांत येथील फ्लायपास्टमध्ये ध्वज आणि नौदलाच्या बोधचिन्हासह चेतक, एमएच 60 आर, सीकिंग, कामोव 31, डोर्नियर, पी8आय आणि मिग 29 के यांचा समावेश होता.”
निलीमा चितळे/विजयालक्ष्मी साळवी-साने/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2181211)
Visitor Counter : 11
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam