पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2025 11:16AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी या दिग्गज कलाकाराला श्रद्धांजली वाहिली असून, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाचे आणि प्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांना आनंद देण्याच्या त्यांच्या क्षमतेचे स्मरण केले.
X वरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले:
"गोवर्धन असरानी जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. एक प्रतिभावान मनोरंजनकार आणि खऱ्या अर्थाने अष्टपैलू कलाकार असलेले असरानी यांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आपल्या अविस्मरणीय अभिनयाद्वारे त्यांनी असंख्य जीवनात आनंद आणि हास्य फुलवले. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना.ओम शांती."
निलीमा चितळे/हेमांगी कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2181102)
आगंतुक पटल : 37
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam