पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशाला दिलेल्या भेटीची काही क्षणचित्रे केली सामायिक

Posted On: 16 OCT 2025 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर  2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशाला दिलेल्या भेटीची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. श्रीशैलम इथे, पंतप्रधानांनी श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वारला देवस्थानामध्ये प्रार्थना केली तसेच, श्री शिवाजी ध्यान मंदिर आणि श्री शिवाजी दरबार हॉलला भेट दिली. त्यानंतर, त्यांनी कर्नूल इथे सुमारे 13,430 कोटी रुपये किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही केले.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाजमाध्यमावर सामयिक केलेली संदेश मालिका:

श्रीशैलम इथल्या श्री भ्रमरांबा मल्लिकार्जुन स्वामी वारला देवस्थानात प्रार्थना केली. माझ्या देशबांधवांच्चे कल्याण आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. सर्वांना आनंद आणि समृद्धी लाभो.

श्रीशैलम इथली आणखी काही क्षणचित्रे 

“श्रीशैलम इथल्या शिवाजी ध्यान मंदिर आणि श्री शिवाजी दरबार हॉलला भेट दिली. महान छत्रपती शिवाजी महाराज 1677 मध्ये श्रीशैलमला आले होते, आणि त्यांनी श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिरात प्रार्थना केली होती. याच ध्यान मंदिरात त्यांनी ध्यानधारणा केली आणि त्यांना भ्रमरांबा देवीचा आशीर्वाद लाभला.”

श्रीशैलम इथे येणे हा खूप मोठा आनंद देणारा क्षण आहे. या पवित्र ठिकाणाचा प्रत्येक भाग दैवत्वाने भारलेला आहे.  इथल्या लोकांनी आपुलकीच्या भावनेतून केलेल्या स्वागताबद्दल मी कृतज्ञ आहे. श्री भ्रमरांबिका देवी आणि मल्लिकार्जुन स्वामींचा आपल्या देशाला सदैव आशीर्वाद लाभो.

“श्रीशैलम इथल्या श्री शिवाजी ध्यान मंदिर आणि श्री शिवाजी दरबार हॉलला भेट दिली. महान छत्रपती शिवाजी महाराज हे 1677 मध्ये श्रीशैलमला आले होते आणि त्यांनी श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिरात  प्रार्थना ही केली होती.

ध्यान मंदिर इथे त्यांनी ध्यानधारणा केली होती, आणि इथेच त्यांना भ्रमरांबा देवीचा आशीर्वाद लाभला होता.”

विकसित भारत प्रत्यक्षात साकारण्यात, आंध्र प्रदेशाची महत्वाची भूमिका असणार आहे, आणि आंध्र प्रदेशात देखील रायलसीमाचा विकास होणे तितकेच महत्त्वाचे आहे. चंद्राबाबू नायडू गारू यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेशातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार राज्याच्या सर्वांगीण विकासाची सुनिश्चिती करण्यासाठी वचनबद्ध आहे. 

अलिकडच्या वर्षांत, आंध्र प्रदेशाने ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साध्य केली आहे. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमुळे केवळ राज्याच्याच ऊर्जा क्षमतेत लक्षणीय वाढ होणार नाही, तर या क्षेत्रातील भारताच्या एकूण प्रगतीलाही हातभार लागणार आहे.

भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र आंध्र प्रदेशात उभारले जात आहे, त्याचा संपूर्ण जगाला लाभ होईल. या प्रकल्पामुळे विशाखापट्टणमला जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संपर्क जोडणीचे केंद्र म्हणून नवी ओळख प्राप्त होईल.

आंध्र प्रदेश सरकारने कर्नूलला ड्रोन केंद्र बनवण्याचा संकल्प केला आहे, याचा मला आनंद आहे. या प्रयत्नामुळे भविष्यवेधी तंत्रज्ञानाच्या बाबतीत नवे दरवाजे खुले होतील आणि संपूर्ण राज्यात विविध क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होतील.

संपूर्ण राज्यात सुपर जीएसटी, सुपर बचत मोहीम यशस्वीपणे राबवल्याबद्दल आंध्र प्रदेश सरकारचे, विशेषतः मंत्री नारा लोकेश गारू यांचे अभिनंदन. नवोन्मेषी  स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी युवा वर्गात वस्तू आणि सेवाकराबद्दलच्या जागृतीत अधिक भर टाकली.

बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संभाव्य यशाबद्दल चंद्राबाबू नायडू गारू यांनी इतक्या चांगल्या हिंदीत बोलून, केवळ बिहारमधीलच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांचीच मने जिंकली नाहीत, तर एक भारत श्रेष्ठ भारताप्रति आपल्या दृढ वचनबद्धतेचेही दर्शन घडवले.

कर्नूलमधील उत्साह अपवादात्मक होता! आज उद्घाटन झालेल्या विकास कामांमुळे लोक खरोखरच आनंदी आहेत.

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2180238) Visitor Counter : 17