पंतप्रधान कार्यालय
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली
या भेटीमुळे द्विपक्षीय भागीदारीला नवी गती मिळेल असा विश्वास पंतप्रधानांकडून व्यक्त
जी 7 शिखर परिषदेसाठीचा कॅनडा दौरा आणि पंतप्रधान कार्नी यांच्यासोबतच्या बैठकीची पंतप्रधानांकडून आठवण
व्यापार, उर्जा, तंत्रज्ञान, कृषी आणि नागरी संबंधातील सहकार्यवाढीच्या महत्त्वाची पंतप्रधानांकडून दखल
पंतप्रधान कार्नी यांना शुभेच्छा देऊन आगामी कार्यक्रमांसाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
13 OCT 2025 4:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2025
कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी परराष्ट्र मंत्री आनंद यांचे स्वागत केले आणि त्यांची भेट भारत कॅनडा द्विपक्षीय भागीदारीला नवी गती देण्याच्या प्रयत्नांना बळ देईल असे म्हटले.
जी 7 शिखर परिषदेसाठी यावर्षी जून महिन्यात कॅनडाला भेट दिल्याचे स्मरण करुन या भेटीत कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यासोबत अत्यंत सफल चर्चा झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
व्यापार, उर्जा, तंत्रज्ञान, कृषी आणि नागरी संबंधांमधील वाढत्या सहकार्याचे महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना शुभेच्छा दिल्या आणि आगामी काळातील द्विपक्षीय संबंधांबाबत आपण उत्सुक असल्याचे सांगितले.
निलीमा चितळे/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2178496)
आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam