पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांची क्वालकॉमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत भेट; कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष आणि कौशल्य विकासातील भारताच्या प्रगतीवर चर्चा
प्रविष्टि तिथि:
11 OCT 2025 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्वालकॉमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) क्रिस्तियानो आर. अमोन यांची भेट घेतली आणि भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), नवोन्मेष आणि कौशल्य विकास या क्षेत्रांतील प्रगतीवर चर्चा केली.
पंतप्रधानांनी भारताच्या सेमिकंडक्टर आणि एआय मिशन मध्ये क्वालकॉमच्या बांधिलकीचे कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, भारताकडे जागतिक पातळीवर परिवर्तन घडविणाऱ्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीसाठी अतुलनीय प्रतिभा आणि क्षमता आहे.
क्रिस्तियानो आर. अमोन यांनी पंतप्रधानांशी झालेल्या समृद्ध चर्चेबद्दल आभार मानले. त्यांनी क्वालकॉम आणि भारत यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी, विशेषतः इंडिया एआय आणि इंडिया सेमिकंडक्टर मिशन तसेच 6G तंत्रज्ञान संक्रमण यांमध्ये सहकार्याच्या संधींबद्दल चर्चा केली. त्यांनी एआय स्मार्टफोन्स, पीसीज, स्मार्ट ग्लासेस, ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रे यांमध्ये भारतीय पर्यावरणीय प्रणाली विकसित करण्याच्या संधींवरही भर दिला.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
“क्रिस्तियानो आर. अमॉन यांच्याशी झालेली भेट अत्यंत उत्तम राहिली. भारतातील एआय, नवोन्मेष आणि कौशल्य विकासातील प्रगतीबद्दल चर्चा करताना आनंद झाला.क्वालकॉमच्या सेमिकंडक्टर आणि एआय मिशनसाठीच्या वचनबद्धतेचे कौतुक.भारताकडे अशी प्रतिभा आणि क्षमता आहे जी आपल्या सामूहिक भविष्याला आकार देणारे तंत्रज्ञान निर्माण करू शकते.”
@cristianoamon
@Qualcomm”
* * *
निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2177788)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam