पंतप्रधान कार्यालय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यातील कराराचे पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2025 10:32AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या पहिल्या टप्प्यातील शांतता कराराचे स्वागत केले आहे.
पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मजबूत नेतृत्वामुळे झालेल्या परिवर्तनाचे हे प्रतिबिंब आहे,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. ओलिसांची सुटका आणि गाझाच्या लोकांना मानवतावादी दृष्टिकोनातून केलेल्या मदतीमुळे अत्यंत आवश्यक असलेली शांतता प्रस्थापित होईल आणि या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होण्यासाठी मार्ग मोकळा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यम ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले आहे;
“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कराराचे आम्ही स्वागत करतो. ही गोष्ट पंतप्रधान नेतन्याहू यांच्या मजबूत नेतृत्वाचे देखील प्रतिबिंब आहे.”
आपल्याला आशा आहे की, ओलिसांची सुटका आणि गाझा येथील लोकांना मानवतावादी दृष्टिकोनातून केलेल्या मदतीमुळे त्यांना दिलासा मिळेल आणि कायमस्वरूपी शांतीचा मार्ग प्रशस्त होईल.
@realDonaldTrump
@netanyahu”
सुवर्णा बेडेकर/संपदा पाटगावकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2176620)
आगंतुक पटल : 32
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam