पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी युनायटेड किंगडमचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या पहिल्या अधिकृत भारत भेटीत त्यांचे स्वागत केले
Posted On:
08 OCT 2025 5:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025
भारताच्या पहिल्याच ऐतिहासिक अधिकृत दौऱ्यावर आलेले युनायटेड किंगडमचे पंतप्रधान महामहिम कीर स्टारमर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले. स्टारमर यांच्याबरोबर युनायटेड किंगडमहुन व्यापारविषयक चर्चा करण्यासाठी आजवरचे सर्वात मोठे शिष्टमंडळ आले आहे.
भारत आणि युनायटेड किंगडम यांच्या सशक्त व प्रगतिशील भविष्यकाळाच्या सामायिक दृष्टिकोनाला पुढे नेण्याच्या दृष्टीने आपण उद्याच्या भेटीची वाट पाहत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी 'एक्स' वरील आपल्या संदेशात म्हटले आहे,
“युनायटेड किंगडममधून येणाऱ्या आजवरच्या सर्वात मोठ्या शिष्टमंडळासह भारताच्या ऐतिहासिक पहिल्याच भेटीत पंतप्रधान कीर स्टारमर यांचे स्वागत आहे. आपल्या सशक्त व प्रगतिशील भविष्यकाळाचा सामायिक दृष्टिकोन पुढे नेण्याच्या दृष्टीने उद्याच्या भेटीची वाट पाहत आहे.
@Keir_Starmer”
सुषमा काणे/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2176371)
Visitor Counter : 15
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam