पंतप्रधान कार्यालय
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा यावरील सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचा मसुदा
Posted On:
24 APR 2024 9:54AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2024
मान्यवर आणि मित्रांनो,
नमस्कार! मी तुम्हा सर्वांचे भारतामध्ये हार्दिक स्वागत करतो. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा या विषयावरच्या सहाव्या आंतरराष्ट्रीय परिषदेला आपण सर्व उपस्थित राहिलात हे खूप महत्त्वाची बाब आहे. तुमची उपस्थिती या महत्त्वाच्या विषयाचा जागतिक स्तरावरची चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी मौल्यवान आहे.
मित्रांनो,
गेल्या काही वर्षांत आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीची झालेली प्रगती लक्षणीय आहे. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीला 2019 मध्ये आरंभ झाला तिथून आपण बरेच पुढे आलो आहोत. आता ही 39 देश आणि 7 संघटनांची जागतिक युती बनली आहे. हे भावी काळासाठी उत्तम आहे.
मित्रांनो,
नैसर्गिक संकटे वारंवार येत आहेत आणि ती अधिकाधिक गंभीर होत आहेत, याचा अनुभव आपण घेत आहोत. त्यामुळे होणारे नुकसान हे सहसा डॉलरमध्ये मोजले जाते. पण माणसांवर, कुटुंबांवर आणि समुदायावर त्यांचा होणारा खरा परिणाम हा या आकडेवारीच्या पलीकडे असतो. भूकंपामुळे घरे पडतात, हजारोंनी लोक बेघर होतात, नैसर्गिक आपत्तींमुळे पाणीपुरवठा तसेच सांडपाण्याच्या व्यवस्था विस्कळीत होऊ शकतात, त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. काही संकटे ऊर्जा प्रकल्पांवर परिणाम करू शकतात. त्यातून अधिक धोक्याची परिस्थिती उद्भवू शकते. या सर्व गोष्टींचा मानवी जीवनावर परिणाम होतो.
मित्रांनो,
उत्तम भवितव्यासाठी आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवर आपण आज खर्च करायलाच हवा. नवीन पायाभूत सुविधा निर्माण करताना त्या प्रतिरोधक असण्याची आवश्यकता लक्षात घ्यायला हवी. याशिवाय त्या संकटानंतरच्या बांधकामातही प्रतिरोध हा नवीन पायाभूत सुविधांचा अनिवार्य भाग बनायला हवा. नैसर्गिक संकटांनंतर सुटका आणि बचाव कार्य यावर आधी भर दिला जातो. या प्राथमिक प्रतिसादानंतर आपल्या पायाभूत सुविधांमध्ये प्रतिरोध समाविष्ट करण्यावर भर देणे आवश्यक आहे.
मित्रहो,
निसर्ग आणि नैसर्गिक संकट यांना देशांमधील सीमांचे बंधन नसते. आता तर जग जोडले गेलेले आहे. अशावेळी संकटे आणि त्यातून होणारे नुकसान यांचा परिणाम दूरपर्यंत जाणवतो. त्यामुळेच जेव्हा प्रत्येक देश स्वतंत्रपणे प्रतिरोधक असेल तेव्हा जग हे एकत्रितपणे प्रतिरोधक बनवू शकेल . धोक्यांच्या सामायिक स्वरूपामुळे प्रतिरोध सामायिक असणे महत्त्वाचे आहे. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी आणि ही परिषद आपल्याला या सर्वसमावेशक अभियानासाठी एकत्र येण्यास सहाय्यक ठरेल.
मित्रहो,
सामायिक प्रतिरोधाकडे वाटचाल करत असताना आपल्याला जे जास्त कमकुवत आहेत त्यांना सहकार्य दिले पाहिजे. उदाहरणार्थ. लहान बेटांवरील विकसनशील राष्ट्रांना या संकटाची जास्त झळ पोहचते. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी हा असा उपक्रम आहे ज्यातून जवळपास 13 अशा ठिकाणांना निधी दिला आहे. डोमनिका मधील आपत्ती प्रतिरोधक घर बांधणी, पापुआ न्यू गिनीमध्ये आपत्ती प्रतिरोधक नेटवर्क आणि डॉमिनिक रिपब्लिक तसेच फिजीमधील आधुनिक संदेश व्यवस्था ही त्यातील काही उदाहरणे. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी ही ग्लोबल साऊथवर लक्ष केंद्रित करत आहे ही मोठी आनंदाची बाब आहे.
मित्रहो,
भारताच्या जी20 यजमानपदाच्या काळात एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. या सर्व चर्चांमध्ये एक नवीन आपदा जोखीम प्रतिबंधक कार्य गट तयार करण्यात आला. आता आपत्ती प्रतिरोध पायाभूत सुविधा आघाडी सोबतच अशी पावले जगाला प्रतिरोधात्मक भविष्याकडे घेऊन जातील. भारतीय आपत्ती प्रतिबंधक पायाभूत सुविधा आघाडी येत्या दोन दिवसात अशाच प्रकारच्या उत्तमोत्तम फलदायी चर्चा करेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद
* * *
नेहा कुलकर्णी/विजया सहजराव/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2176001)
Visitor Counter : 6
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam