राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते माय भारत – राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कारांचे वितरण
प्रविष्टि तिथि:
06 OCT 2025 4:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज, दिनांक 06 ऑक्टोबर 2025 रोजी वर्ष 2022-23 साठीचे माय भारत – राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान केले.
माय भारत – राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) हा भारत सरकारचा महत्त्वपूर्ण कार्यक्रम असून स्वयंसेवी समाज सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व तसेच चारित्र्य विकसित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. वर्ष 1969 मध्ये, महात्मा गांधीजींच्या जन्मशताब्दी सोहोळ्यादरम्यान ही योजना सुरु करण्यात आली.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने 1993-94 मध्ये माय भारत – एनएसएस पुरस्कार देण्याची पद्धत सुरु केली. या पुरस्काराद्वारे समाज सेवा, समुदाय विकास आणि देश उभारणीच्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात येऊन त्यांचे यश साजरे केले जाते.



* * *
शैलेश पाटील/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2175385)
आगंतुक पटल : 35