पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी श्री बिल गेट्स यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिल्याबद्दल आनंद व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
02 MAR 2024 2:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मार्च 2024
बिल गेट्स यांच्या, स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेटीच्या अनुभवांवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींनी जगभरातील लोकांना भविष्यात या ठिकाणाला भेट देण्याचे आवाहनही केले आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिल्यानंतर, बिल गेट्स यांनी एक्स या मंचावर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा एक अभियांत्रिकी चमत्कार असून सरदार पटेल यांना एक उत्तम श्रद्धांजली आहे. यामुळे स्थानिक आदिवासी समुदायांसाठी, विशेषतः महिलांसाठी आर्थिक संधी निर्माण होत आहेत , हे पाहून आनंद झाला असे बिल गेट्स म्हणाले.
बिल गेट्स यांनी एक्स मंचावर केलेल्या पोस्टला उत्तर देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले:
"हे पाहून आनंद झाला! ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ इथला तुमचा अनुभव आनंददायी ठरला, याचा मला आनंद आहे. मी जगभरातील लोकांना भविष्यात या ठिकाणी भेट देण्याचे आवाहन करतो. @BillGates"
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2175040)
आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam