पंतप्रधान कार्यालय
श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या वारशाच्या परिपूर्ततेला पंतप्रधानांनी केले अधोरेखित, त्यापासून प्रेरणा घेण्याचे युवा वर्गाला केले आवाहन
Posted On:
04 OCT 2025 11:11AM by PIB Mumbai
स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या कित्येक वर्षे अपूर्ण राहिलेल्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी सुमारे दोन दशकांपूर्वी झालेल्या अतिशय समाधानकारक सखोल राष्ट्रीय प्रयत्नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अधोरेखित केले. श्यामजी कृष्ण वर्मा यांचे 1930 मध्ये निधन झाले, त्यावेळी त्यांनी आपल्या अस्थी एक दिवस स्वतंत्र भारतात परत येतील या आशेवर देह ठेवला होता. त्यांची ही एकमेव इच्छा कित्येक वर्षे अपूर्ण राहिली होती, जी ऑगस्ट 2003 मध्ये गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या अस्थी स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथून परत आणण्यासाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलून पूर्ण केली.
या पावलाने भारत मातेच्या या शूर सुपुत्राच्या स्मृतीचा सन्मान केला आणि देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या वारशाचे जतन करण्याच्या भारताच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला, असे त्यांनी नमूद केले.
श्यामजी कृष्ण वर्मा यांचे जीवन, न्यायाचा निर्भीड पाठपुरावा आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी अढळ समर्पित वृत्ती याविषयी अधिकाधिक भारतीय वाचन करतील, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली
मोदी अर्काईव्ह हँडलच्या एक्सवरील एका पोस्टला प्रतिसाद देताना, मोदी म्हणालेः
“या थ्रेडमध्ये सुमारे दोन दशकांपूर्वी केलेल्या एका अतिशय समाधानकारक प्रयत्नावर प्रकाश टाकला आहे, ज्याद्वारे श्यामजी कृष्ण वर्मा यांची इच्छा पूर्ण झाली आणि 'भारत मातेच्या एका शूर सुपुत्राचा सन्मान करण्यात आला.
त्यांच्या महानतेबद्दल आणि शौर्याबद्दल अधिकाधिक तरुणांनी वाचावे!”
***
नेहा कुलकर्णी / शैलेश पाटील / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2174725)
Visitor Counter : 11
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam