इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
सरकारच्या इलेक्ट्रॉनिक सुटे भाग उत्पादन योजनेला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उद्योगांकडून अभूतपूर्व प्रतिसाद; रु. 1,15,351 कोटी गुंतवणुकीचे अर्ज प्राप्त
राज्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आणि त्यांच्या राज्यांत इलेक्ट्रॉनिक उत्पादन उद्योग विकसित करण्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आवाहन आणि त्यामुळे तरुणांना मोठ्या संख्येने रोजगार मिळेल असा व्यक्त केला विश्वास
Posted On:
02 OCT 2025 4:57PM by PIB Mumbai
इलेक्ट्रॉनिक्स सुटे भाग उत्पादन योजनेला दोन्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उद्योगातील आघाडीच्या नेतृत्वाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताची वाढती प्रतिष्ठा आणि सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांचा समावेश असलेल्या देशांतर्गत उद्योगांवरील वाढता विश्वास दिसून येतो. योजनेचे उद्दिष्ट देशाला इलेक्ट्रॉनिक उत्पादनात स्वावलंबी बनवणे आहे.
या योजनेमधून, 1,42,000 थेट रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे जी लक्ष्यित 91, 600 रोजगार उद्दिष्टापेक्षा कितीतरी जास्त आहे, तसेच असंख्य अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होण्याची क्षमता यामध्ये दिसून येते आहे.
या उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करताना, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यांना या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आणि त्यांच्या प्रदेशात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनासाठी अनुकूल चौकट विकसित करण्याचे आवाहन केले. इलेक्ट्रॉनिक्स निकेतन येथे झालेल्या वार्ताहर परिषदेत बोलताना, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन उद्योग तरुणांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण करत असल्यावर त्यांनी भर दिला आहे.
सलग योजनांमुळे भारताची इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन परिसंस्था भक्कम झाली आहे आणि इलेक्ट्रॉनिक सुटे भाग उत्पादन योजना आता मूल्य साखळीचे एकीकरण पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे, त्यामुळे भारत एक व्यापक जागतिक उत्पादन केंद्र म्हणून स्थान मिळवेल, असे ते म्हणाले.
मंत्रिमंडळाने 1 मे 2025 रोजी 22,919 कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजूर केलेल्या या योजनेसाठी 1,15,351 कोटी रुपयांच्या प्रस्तावित गुंतवणुकीसह 249 अर्ज प्राप्त झाले आहेत.
या योजनेअंतर्गत, 59,350 कोटी रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा हा प्रतिसाद जवळपास दुप्पट आहे. येत्या सहा वर्षांच्या काळात या योजनेअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स घटकांचे अंदाजे उत्पादन एकंदर 10,34,700 कोटी रुपये असेल. या योजनेअंतर्गत 4,56,000 कोटी रुपयांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत 2.2 पट आहे.
या प्रचंड प्रतिसादाचे देशातील नागरिकांसाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांमध्ये रूपांतर होईल. यासाठी अर्ज करण्यासाठी 1 मे 2025 पासून 3 महिन्यांची मुदत दिली होती आणि ती 30 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली होती.
***
शैलेश पाटील / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2174305)
Visitor Counter : 5