पंतप्रधान कार्यालय
विजय कुमार मल्होत्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
30 SEP 2025 8:44AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय कुमार मल्होत्रा यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
मोदी म्हणाले की, विजय कुमार मल्होत्रा जी हे एक उत्कृष्ट नेते होते. त्यांना लोकांच्या प्रश्नांची खूप चांगली जाण होती आणि संसदेतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचे नेहमी स्मरण केले जाईल.
पंतप्रधानांनी X मध्यमावर पोस्ट केले की:
"विजय कुमार मल्होत्रा जी हे एक उत्कृष्ट नेते म्हणून ओळखले जात. त्यांना लोकांच्या प्रश्नांची खूप चांगली जाण होती. त्यांनी दिल्लीत आमच्या पक्षाला बळकटी देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. संसदीय हस्तक्षेपासाठीही त्यांचे स्मरण केले जाते. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांचे कुटुंबिया आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना. ओम शांती."
***
SonalTupe/HemangiKulkarni/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2172996)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam