गृह मंत्रालय
केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे
Posted On:
29 SEP 2025 9:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2025
सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे. लडाखबाबत उच्चाधिकार-प्राप्त समिती किंवा अशा कोणत्याही व्यासपीठाच्या माध्यमातून एबीएल आणि केडीए सोबत चर्चेचे आम्ही यापुढेही स्वागत करत राहू.
लडाखबाबत उच्चाधिकार-प्राप्त समितीच्या (एचपीसी) माध्यमातून अपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत स्थापित संवाद यंत्रणेमुळे आजपर्यंत लडाखच्या अनुसूचित जमातींना आरक्षण वाढवणे, एलएएचडीसीमध्ये महिलांना आरक्षण आणि स्थानिक भाषांना संरक्षण यांसारखे चांगले परिणाम दिसून आले आहेत. केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये 1800 सरकारी पदांसाठी भर्ती प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.
आम्हाला विश्वास आहे की सातत्यपूर्ण संवादातून नजीकच्या भविष्यात इच्छित परिणाम मिळतील.
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2172915)
Visitor Counter : 10
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam