पंतप्रधान कार्यालय
रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
कृषी, खते, अन्न प्रक्रिया आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य सहकार्य वृद्धींगत करण्याच्या मुद्यांवर दोन्ही नेत्यांनी केली चर्चा
23 व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने पुतिन यांचे भारतात स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली व्यक्त
प्रविष्टि तिथि:
25 SEP 2025 10:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 सप्टेंबर 2025
रशियाचे उप पंतप्रधान दिमित्री पात्रुशेव यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीत दोन्ही नेत्यांनी कृषी, खते, अन्न प्रक्रिया आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धींगत करण्याच्या मुद्यांवर विचारांची देवाणघेवाण केली.
यावेळी पंतप्रधानांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याप्रति सदिच्छा व्यक्त केली, तसेच आगामी 23 व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या निमित्ताने पुतीन यांचे भारतात स्वागत करण्यासाठी आपण उत्सुक असल्याची भावनाही व्यक्त केली.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2171518)
आगंतुक पटल : 43
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam