पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि विचारवंत एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

प्रविष्टि तिथि: 24 SEP 2025 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 सप्‍टेंबर 2025

 

प्रख्यात कन्नड साहित्यिक आणि विचारवंत एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. भैरप्पा हे राष्ट्राच्या चेतनेला जागृत करणारे आणि भारताच्या आत्म्याचा गहन शोध घेणारे थोर व्यक्तिमत्त्व होते, असे पंतप्रधान म्हणाले.

भैरप्पा यांचे भारतीय साहित्यात, विशेषतः कन्नड साहित्यातील योगदान, देशाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर अमिट ठसा उमटवणारे आहे. इतिहास, तत्त्वज्ञान आणि सामाजिक प्रश्नांशी त्यांची  बांधिलकी  अनेक पिढ्या आणि भौगोलिक प्रदेशांमध्ये प्रशंसा पात्र ठरली, असे पंतप्रधान म्हणाले.

एक्स या सामाजिक माध्यमांवरील शोक संदेशात पंतप्रधान म्हणाले की

एस. एल. भैरप्पा यांच्या निधनामुळे आपण एका थोर व्यक्तिमत्त्वाला मुकलो आहोत, ज्यांनी आपल्या चेतनेला स्पर्श केला आणि भारताच्या आत्म्याचा गहन शोध घेतला. ते निर्भय आणि शाश्वत विचारवंत होते. त्यांच्या विचारप्रवर्तक साहित्यामुळे कन्नड साहित्य समृद्ध झाले. त्यांच्या लेखनाने अनेक पिढ्यांना चिंतन  करण्यास, प्रश्न विचारण्यास आणि समाजाशी अधिक सखोल नाते जोडण्यास प्रेरित केले.

इतिहास आणि संस्कृतीबद्दलची त्यांची अतूट निष्ठा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखद क्षणी त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती."

 

 

* * *

निलिमा चितळे/राज दळेकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2170903) आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam