माहिती आणि प्रसारण मंत्रालय
स्टार्ट अप क्षेत्राला चालना देणाऱ्या 'वेव्हएक्स' या व्यासपीठाने मीडिया, एंटरटेनमेंट आणि एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील स्टार्टअप्सना बळकट करण्यासाठी सात नवीन इनक्यूबेशन सेंटर्स सुरू करण्याची केली घोषणा
आयआयएमसी (दिल्ली, जम्मू, ढेंकनाल, कोट्टायम, अमरावती); एफटीआयआय, पुणे आणि एसआरएफटीआय, कोलकाता येथे सुरू होणारे नवीन केंद्र फिल्म, गेमिंग आणि एक्सआर स्टार्टअप्ससाठी जागतिक दर्जाच्या सुविधा करणार प्रदान
स्टार्टअप्सना आयआयसीटी, एफटीआयआय, एसआरएफटीआय आणि इतर भागीदार इनक्यूबेटर्सद्वारे चित्रपट निर्मिती, गेम डेव्हलपमेंट, एडिटिंग आणि चाचणीसाठी प्रगत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार
Posted On:
24 SEP 2025 9:39AM by PIB Mumbai
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्हज उपक्रमांतर्गत स्टार्टअप परिसंस्थेला चालना देणाऱ्या वेव्हएक्स या व्यासपीठाने मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (आयआयसीटी), येथे सध्या उपलब्ध असलेल्या सुविधेव्यतिरिक्त, संपूर्ण भारतात सात नवीन इनक्यूबेशन सेंटर्स सुरू करण्याची घोषणा केली आहे. AVGC (अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स) आणि XR (एक्सटेंडेड रिअॅलिटी) या क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी समर्पित अॅक्सिलरेटर-कम-इनक्यूबेटर प्रोग्राम सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
सात नवीन केंद्रे:
नवीन घोषित केंद्रे खालील संस्थांमध्ये स्थापन केली जातील :
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC), दिल्ली
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC), जम्मू
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC), ढेंकनाल, ओडिशा
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC), कोट्टायम, केरळ
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC), अमरावती, महाराष्ट्र
- फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII), पुणे, महाराष्ट्र
- सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (SRFTI), कोलकाता, पश्चिम बंगाल
या इनक्यूबेशन नेटवर्क्सच्या प्रारंभामुळे, स्टार्टअप्सना आयआयसीटी, एफटीआयआय, एसआरएफटीआय आणि इतर भागीदार इनक्यूबेटर्सद्वारे चित्रपट निर्मिती, गेम डेव्हलपमेंट, एडिटिंग आणि चाचणीसाठी प्रगत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मुंबईतील प्रमुख आयआयसीटी येथील इनक्यूबेटर सेंटरमध्ये पुढील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत. - 8K रेड रॅप्टर व्हिस्टा व्हिजन कॅमेरा, डॉल्बी अॅटमॉस प्रणालीसह 4K HDR प्रिव्ह्यू थिएटर, उच्च-कार्यक्षमता असलेले एलियनवेअर वर्कस्टेशन्स, एलईडी वॉलसह अत्याधुनिक व्हर्च्युअल प्रोडक्शन स्टेज, फोटोग्रामेट्री प्रणाली, प्रोफेशनल साऊंड अँड कलर मिक्स थिएटर, 4K HDR एडिट सूट, VR चाचणी किट आणि नवीनतम गेमिंग कन्सोल.
या सुविधांमुळे स्टार्टअप्सना जागतिक मानकांनुसार फिल्म, गेमिंग आणि इमर्सिव्ह मीडियामधील आशय आरेखन, विकसित आणि प्रमाणित करण्याची संधी मिळणार आहे. WaveX उपक्रमा अंतर्गत विविध स्टार्टअप्स प्रत्यक्ष आणि डिजिटल व्यासपीठाद्वारे या संसाधनांचा वापर करू शकतील. सहभागी स्टार्टअप्सना व्हिवाटेक (पॅरिस) आणि गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स (यूएसए) सारख्या प्रतिष्ठित जागतिक स्टार्टअप आयोजनात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनामध्ये सहभागी होऊन आपली चुणूक दाखवण्याची संधी देखील मिळणार आहे.
सुविधा आणि मदत :
निवडलेल्या स्टार्टअप्सना इनक्युबेशन सुविधा, उद्योग संपर्क, केंद्र आणि राज्य सरकारबरोबर संपर्क, निधीच्या रुपात मदत, विक्री आणि विपणन मार्गदर्शन इत्यादी सुविधा मिळतील. नवीन केंद्रे मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज (IICT) प्रमाणेच पायाभूत सुविधा आणि इनक्युबेशन सुविधा प्रदान करतील. यामुळे देशभरात उच्च-गुणवत्तेच्या इनक्युबेशन, पायाभूत सुविधा आणि मार्गदर्शनाची एकसमान उपलब्धता सुनिश्चित होईल.
प्रत्येक इनक्यूबेशन सेंटरमध्ये सहभागी होणाऱ्या स्टार्टअप्सना खालील सुविधा प्रदान केल्या जातील:
- सहकार्यस्थळे, एव्ही/डिजिटल लॅब आणि स्टुडिओ (ग्रीन रूम, फोटो/व्हिडिओ उत्पादन सुविधा)
- हाय-स्पीड लॅन/वाय-फाय, होस्टिंग सर्व्हर, क्लाउड क्रेडिट्स (AWS/गुगल), आणि इंडिया एआय कंप्यूट सर्व्हिसेस
- ओटीटी, व्हीएफएक्स, व्हीआर, गेमिंग, ॲनिमेशन, प्रकाशन आणि पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये सँडबॉक्स चाचणीच्या संधी
- जागतिक नेते आणि उद्योग तज्ञांकडून संरचित मार्गदर्शन आणि सल्याच्या रूपात मदत
- मास्टरक्लासेस, फोकस्ड बूटकॅम्प, पॉलिसी क्लिनिक आणि गुंतवणूकदार संपर्क सत्रे
- आयआयटी, टी-हब आणि इतर स्थापित इनक्यूबेटर्ससह भागीदारी करून शिकण्याच्या आणि नवोन्मेषाच्या व्यापक संधी
याशिवाय, वेव्हएक्स अंतर्गत इनक्यूबेशन करणाऱ्या स्टार्टअप्सना दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पत्र सूचना कार्यालय, प्रकाशन विभाग, न्यू मीडिया विंग आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर यासारख्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या मीडिया युनिट्सशी जवळून काम करण्याची संधी देखील मिळेल. या मीडिया युनिट्सद्वारे आउटसोर्स केलेल्या प्रकल्पांमध्ये निवडक स्टार्टअप्सना देखील प्राधान्य दिले जाऊ शकते.
अर्ज प्रक्रिया
यासाठी अर्ज आता खुले असून इच्छुक स्टार्टअप्स wavex.wavesbazaar.com या संकेतस्थळाला भेट देऊन, डॅशबोर्ड वरील सूचनांचे पालन करत इनक्यूबेशनसाठी अर्ज करा हा पर्याय निवडून आणि पसंतीचे इनक्यूबेशन सेंटर निवडून करून अर्ज दाखल करू शकतात.
- स्टार्टअप्सची संख्या: प्रत्येक ठिकाणी पहिल्या तुकडीसाठी 15 स्टार्टप्स निवडले जातील
- मासिक शुल्क : 8,500 + GST प्रति स्टार्टअप
- पात्रता : मीडिया-एंटरटेनमेंट आणि AVGC-XR क्षेत्रातील स्टार्टअप्सना प्राधान्य दिले जाईल.
'वेव्हएक्स' बद्दल अधिक माहिती:-
वेव्हएक्स हे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या WAVES उपक्रमांतर्गत स्टार्टअप मला चालना देणारे व्यासपीठ आहे. हे व्यवस्थित प्रसार माध्यमे, मनोरंजन आणि सर्जनशील तंत्रज्ञानामधील नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. इनक्यूबेटर्सच्या नेटवर्कद्वारे, वेव्हएक्स भारतातील नव्या पिढीतील निर्माते आणि उद्योजकांना सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा, मार्गदर्शन आणि जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करून देते.
वेव्हएक्सचे इनक्यूबेशन मॉडेल दोन टप्प्यात कार्य करते:
- सक्रिय टप्पा: व्यवसाय मॉडेलिंग, उत्पादन विकास, ब्रँडिंग, निधी संकलन आणि मीडिया नियमांबाबत मार्गदर्शन.
- निष्क्रिय टप्पा: वेव्हज बाजार आणि चालू गुंतवणूकदार/उद्योग सहभागाद्वारे जागतिक स्तरावर संधी दर्शविण्यासाठी मार्गदर्शन.
वेव्हएक्सचे उद्दिष्ट मीडिया क्षेत्रातील नवोन्मेषी आणि बदल घडवणाऱ्या कल्पनांसाठी एक सक्षम परिसंस्था निर्माण करणे हे आहे. पारंपरिक इनक्युबेटर आणि ॲक्सेलरेटरपेक्षा हे वेगळे आहेत , कारण AVGC क्षेत्रातील उत्पादने अनेकदा अपूर्ण (unreal stage) अवस्थेत असतात. वेव्हएक्स अशा प्रारंभीच्या स्टार्टअप्सना त्यांच्या संभाव्यतेच्या आधारावर पाठबळ देते, केवळ तयार उत्पादनांवर नाही.
गेमिंग, ओटीटी, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आशय निर्मिती आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञान (AR/VR/XR) या क्षेत्रातील नव्या पिढीतील उद्योजकांना उद्योग मार्गदर्शन, धोरणात्मक निधीची उपलब्धता आणि अत्याधुनिक पायाभूत सुविधा देण्यासाठी वेव्हएक्स ची रचना करण्यात आली आहे.
***
ShilpaPophale/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2170530)
Visitor Counter : 6