पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इटानगरमधील स्थानिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांची पंतप्रधानांनी घेतली भेट

Posted On: 22 SEP 2025 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 सप्‍टेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटानगर इथे स्थानिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांची भेट घेतली. या भेटीत व्यापाऱी आणि विक्रेत्यांनी आपली विविध प्रकारची, विविधरंगी उत्पादने दाखविली. “जीएसटी सुधारणांबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. मी त्यांना ‘गर्व से कहो ये स्वदेशी है’ असे लिहीलेले फलकही दिले. हे फलक आम्ही आमच्या दुकानात लावू असे त्यांनी उत्साहाने सांगितले,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान एक्स माध्यमावरील संदेशात लिहीतात,

“आजच्या सुर्योदयासोबतच भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाटचालीत एक नवीन अध्याय सुरू झाला, जीएसटी बचत उत्सव! आणि यासाठी देशातले उगवत्या सुर्याचे सुंदर ठिकाण असलेल्या अरुणाचल प्रदेशपेक्षा सुंदर जागा कुठली असू शकते?

आज मी इटानगरमध्ये स्थानिक व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांना भेटलो. त्यांनी मला सुवासिक चहा, लोणची, हळद, बेकरी उत्पादने, हस्तकला आणि इतर असंख्य वैविध्यपूर्ण उत्पादने दाखविली.

जीएसटीमध्ये सुधारणा केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांना ‘गर्व से कहो ये स्वदेशी है’ असे लिहिलेले फलक दिले. हे फलक आम्ही आमच्या दुकानाबाहेर उत्साहाने लावू असे त्यांनी सांगितले.”  

 

* * *

सुषमा काणे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2169688)