पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मोहनलाल यांचे दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन
Posted On:
20 SEP 2025 7:42PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. मोहनलाल हे उत्कृष्ट आणि अष्टपैलू अभिनयाचे प्रतीक आहेत. अनेक दशकांपासून केलेल्या समृद्ध कामामुळे ते मल्याळम सिनेमा आणि रंगभूमीचे एक अग्रगण्य प्रकाशस्तंभ आहेत. त्यांना केरळच्या संस्कृतीविषयी उत्कट आत्मीयता आहे. त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विविध माध्यमांमधील त्यांची सिनेमॅटिक आणि नाट्यमय प्रतिभा खरोखरच प्रेरणादायी आहे, त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. त्यांची कामगिरी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहो, असे मोदी यांनी आपल्या एक्स वरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
***
शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2169096)