पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान दिनांक 2 सप्टेंबर रोजी बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ लिमिटेडचा करणार शुभारंभ
हा जीविका निधी ग्रामीण महिला उद्योजकांना परवडणाऱ्या दरात निधीची उपलब्धता करून देणार
जीविका निधी पूर्णपणे डिजिटल पध्दतीने काम करेल, जेणेकरून निधी हस्तांतरण थेट आणि पारदर्शक पध्दतीने होणार सुनिश्चित
Posted On:
01 SEP 2025 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी, 2 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता दृक्श्राव्य माध्यमाद्वारे बिहार राज्य जीविका निधी साख सहकारी संघ लिमिटेडचे उद्घाटन करणार आहेत. या प्रसंगी पंतप्रधान संस्थेच्या बँक खात्यात 105 कोटी रुपये देखील हस्तांतरित करतील.
जीविका निधी स्थापनेचा उद्देश समुदायातील सदस्यांना परवडणाऱ्या व्याजदरात उपजीविकेशी संबंधित निधी सहज उपलब्ध करून देणे असा आहे. जीविकाचे सर्व नोंदणीकृत समूह - या महासंघ सोसायटीचे सदस्य असतील. या संस्थेच्या कामकाजासाठी, बिहार सरकार तसेच केंद्र सरकार आपल्या निधीतून योगदान देईल.
गेल्या काही वर्षांत उपजीविकेसाठी तयार होणाऱ्या बचत गटांशी संबंधित महिलांमध्ये उद्योजकता वाढली आहे, ज्यामुळे ग्रामीण भागात असंख्य लघु उद्योग आणि उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या आहेत. तथापि, महिला उद्योजकांना अनेकदा 18% ते 24% इतका उच्च व्याजदर आकारणाऱ्या लघुवित्त संस्थांवर अवलंबून राहावे लागते. या बचतगटांचे लघुवित्त संस्थांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि कमी व्याजदराने मोठ्या कर्जाची वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जीविका निधीची संकल्पना एक पर्यायी वित्तीय प्रणाली म्हणून करण्यात आली आहे.
ही प्रणाली पूर्णपणे डिजिटल पध्दतीने कार्य करेल, ज्यामुळे जीविका दीदींच्या बँक खात्यात थेट जलद आणि अधिक पारदर्शक पध्दतीने निधी हस्तांतरण करणे सुनिश्चित होईल. हे सुलभ करण्यासाठी, समुदायातील 12,000 कार्यकर्त्यांना टॅब्लेट्स प्रदान करण्यात येत आहेत.
या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांमध्ये उद्योजकता विकासाला समर्थन मिळेल आणि समुदाय-नेतृत्वाखालील उद्योगांच्या वाढीला गती मिळेल अशी अपेक्षा आहे. बिहार राज्यातील सुमारे 20 लाख महिला या कार्यक्रमाच्या साक्षीदार होतील.
* * *
शैलेश पाटील/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2169051)
Visitor Counter : 10
Read this release in:
Bengali-TR
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam