पंतप्रधान कार्यालय
कोरिया प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षांच्या विशेष दूतांच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
पंतप्रधानांनी भारत आणि कोरिया यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारीचे महत्त्व केले अधोरेखित; दृढ सहकार्य आणि महत्वाच्या क्षेत्रातील गुंतवणुकीवर टाकला प्रकाश
पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांना भारत भेटीचे पुन्हा दिले आमंत्रण
Posted On:
17 JUL 2025 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2025
कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांचे विशेष दूत किम बू क्युम यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी जून 2025 मध्ये झालेल्या, जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांच्याबरोबर झालेल्या उत्साहपूर्ण आणि सकारात्मक बैठकीच्या आठवणींना उजाळा देत भारतात एक उच्च स्तरीय शिष्टमंडळ पाठवण्याच्या राष्ट्राध्यक्ष ली यांच्या निर्णयाचे मनापासून आभार मानले.
विशेष दूत किम यांनी पंतप्रधानांना राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांच्यावतीने शुभेच्छा सामायिक केल्या. तसेच भारताबरोबर असलेल्या विशेष धोरणात्मक भागीदारीला कोरिया प्रजासत्ताक किती महत्त्व देतो, याची पुष्टी करणारा संदेश दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाहीवादी उभय देशांतील दृढ आणि बहुआयामी संबंध, विशेषतः हिंद- प्रशांत प्रदेशात स्थिरता निर्माण करणारी भूमिका बजावत असल्याचे अधोरेखित केले.
पंतप्रधानांनी भारतातील आर्थिक आणि उत्पादनक्षेत्रातील प्रगतीमुळे उदयोन्मुख तंत्रज्ञान, जहाजबांधणी, संरक्षण, इलेक्ट्रॉनिक्स, हरित हायड्रोजन आणि बॅटरी यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये अधिक खोल गुंतवणूक आणि सहकार्याच्या संधी निर्माण झाल्याचे अधोरेखित केले. तसेच भारताच्या लोकसंख्यात्मक लाभाचे आणि कुशल मनुष्यबळाचे सामर्थ्य हे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी परिवर्तनकारी ठरू शकते, यावर त्यांनी भर दिला.
यावेळी उभय देशांनी द्विपक्षीय संबंध अधिक उंचीवर नेण्याच्या दिशेने काम करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
पंतप्रधानांनी शिष्टमंडळाला त्यांच्या प्रयत्नांना यश मिळावे, यासाठी शुभेच्छा दिल्या आणि कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग यांचे भारतात स्वागत करण्याची संधी लवकर मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
* * *
पीआयबी मुंबई | सुवर्णा बेडेकर/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168049)
Visitor Counter : 6
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam