पंतप्रधान कार्यालय
युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
युरोपियन महासंघाने आज स्वीकारलेल्या नवीन धोरणात्मक युरोपियन महासंघ-भारत अजेंडाच्या स्वीकाराबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
भारत- युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार लवकर पूर्ण करण्यासाठी आणि पुढील भारत- युरोपियन महासंघ शिखर परिषद लवकरात लवकर भारतात आयोजित करण्याच्या बांधिलकीचा नेत्यांनी केला पुनरुच्चार
Posted On:
17 SEP 2025 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2025
युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष महामहिम उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांनी पंतप्रधान मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले.
आज युरोपियन महासंघाने नवीन धोरणात्मक ईयू-इंडिया अजेंडा स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही शक्ती म्हणून, नेत्यांनी परस्पर समृद्धीसाठी तसेच जागतिक समस्यांना संयुक्तपणे तोंड देण्यासाठी, स्थिरतेला चालना देण्यासाठी आणि नियम-आधारित व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत- युरोपियन महासंघ धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचे स्वागत केले.
वर्ष अखेरपर्यंत भारत-युरोपियन महासंघ मुक्त व्यापार करार वाटाघाटी पूर्ण करण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.
नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. युक्रेनमधील संघर्षाचे लवकर आणि शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे.
पंतप्रधान मोदींनी पुढील वर्षी भारतात होणाऱ्या भारत- युरोपियन महासंघ शिखर परिषदेसाठी पुन्हा आमंत्रण दिले.
* * *
निलिमा चितळे/वासंती जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2167847)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam