पंतप्रधान कार्यालय
जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेत 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मीनाक्षीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
14 SEP 2025 7:39PM by PIB Mumbai
लिव्हरपूल येथे झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेत 48 किलो वजनी गटात उत्कृष्ट विजय मिळवल्याबद्दल भारतीय महिला मुष्टीयोद्धा मीनाक्षीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले:
"लिव्हरपूलमधील जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद 2025 स्पर्धेत मीनाक्षीच्या उत्कृष्ट कामगिरीचा अभिमान आहे! तिने 48 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. तिचे यश आणि दृढनिश्चय भारतीय खेळाडूंसाठी खूप प्रेरणादायी आहे. तिच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा."
***
सुषमा काणे / शैलेश पाटील / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2166613)
आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam