पंतप्रधान कार्यालय
मोहन भागवत यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा देणारा लेख सामाईक केला
प्रविष्टि तिथि:
11 SEP 2025 8:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025
मोहन भागवत यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामाईक केला आहे. या लेखामध्ये त्यांच्या प्रेरणादायी जीवनावर आणि राष्ट्रसेवेप्रती त्यांच्या अढळ वचनबद्धतेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारत मातेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या मोहन भागवत यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली पंतप्रधानांनी केली आहे. सामाजिक परिवर्तनासाठी तसेच सुसंवाद आणि बंधुत्वाच्या भावनेला बळकटी देण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये मोदी म्हणाले,
"वसुधैव कुटुंबकम, या तत्त्वाने प्रेरित होऊन,मोहन भागवत जी यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सामाजिक परिवर्तनासाठी तसेच सुसंवाद आणि बंधुत्वाच्या भावनेला बळकटी देण्यासाठी समर्पित केले आहे.”
मोहन भागवत यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी, भारत मातेच्या सेवेत सदैव तत्पर असलेल्या मोहन जी यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वावर मी काही विचार लिहिले आहेत. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो ही प्रार्थना.
nm-4.com/Cvvs0Y”
जयदेवी पुजारी-स्वामी/नेहा कुलकर्णी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2165815)
आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam