पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत होत असलेल्या ज्ञान भारतमसंबंधी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्‍ये 12 सप्टेंबरला पंतप्रधान होणार सहभागी


हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, जतन आणि सर्वांसाठी ती खुली व्हावीत यासाठी ज्ञान भारतम पोर्टलचे पंतप्रधान करणार उद्घाटन

हस्तलिखितांचा वारसा जतन करून,भारतीय ज्ञान वारसा पुन्हा मिळवण्‍याची परिषदेची संकल्पना

भारताच्या अमूल्य हस्तलिखीत संपत्तीचे पुनरुज्जीवन करणे परिषदेचे उद्दिष्ट

Posted On: 11 SEP 2025 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास  नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे  ज्ञान भारतमवरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होणार आहेत. हस्तलिखितांचे डिजिटायझेशन, जतन आणि सार्वजनिक प्रवेश म्हणजेच सर्वांसाठी ही हस्तलिखिते खुली करण्‍यासाठी समर्पित डिजिटल ज्ञान भारतम पोर्टलचेही उद्घाटन पंतप्रधान करतील. तसेच याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करतील.

ही परिषद 11 ते 13 सप्टेंबर दरम्यान "हस्तलिखितांच्या अमूल्य भांडारातून भारताचा ज्ञान वारसा पुन्हा मिळवणे" या संकल्पने अंतर्गत आयोजित केली जात आहे. या परिषदेत भारताच्या अमूल्य  हस्तलिखीत संपत्तीचे पुनरुज्जीवन करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी आणि ही संपत्ती जागतिक ज्ञान संवादाच्या केंद्रस्थानी ठेवण्यासाठी आघाडीचे विद्वान, संवर्धनवादी, तंत्रज्ञ आणि धोरण तज्ज्ञ एकत्र येत आहेत. यामध्ये दुर्मिळ हस्तलिखितांचे प्रदर्शन आणि हस्तलिखीत संवर्धन, डिजिटायझेशन तंत्रज्ञान, मेटाडेटा मानके, कायदेशीर चौकट, सांस्कृतिक राजनैतिकता आणि प्राचीन लिपींचा माहिती, त्यांचे अर्थ निर्धारण,  यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर अभ्यासपूर्ण सादरीकरणे केली जाणार आहेत.  


सोनाली काकडे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165795) Visitor Counter : 2