ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री येत्या दहा सप्टेंबर रोजी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशा इलेक्ट्रिक वाहन चाचणी सुविधेचे करणार उद्घाटन
अतिशय चैतन्यशाली इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा, देशांतर्गत उत्पादकतेला आधारभूत ठरणार
जागतिक दर्जाच्या चाचणी आणि प्रमाणनामुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राचा विश्वास द्विगुणित होईल
Posted On:
09 SEP 2025 12:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 सप्टेंबर 2025
शाश्वत गतिशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या ध्येयाशी सुसंगत केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी 10 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमादरम्यान कोलकाता येथील अलिपूर प्रादेशिक प्रयोगशाळेत उभारण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा इलेक्ट्रिक वाहन चाचणी सुविधेचे उद्घाटन करणार आहेत.
अत्यंत अत्याधुनिक पायाभूत सुविधांनी सज्ज अशा या प्रयोगशाळेत ईव्ही बॅटरीवरील आणि उपकरणावरील कठोर चाचण्या केल्या जातील यामध्ये विद्युत सुरक्षा, एफ सी सी / नवोपक्रम, विज्ञान आणि आर्थिक विकास अनुपालन, कार्यात्मक सुरक्षा, टिकाऊपणा, हवामान चाचण्या (IP, UV, गंज), आणि यांत्रिक आणि भौतिक सुरक्षा (ज्वलनशीलता, ग्लो वायर इ.) यांचा समावेश आहे. ही सुविधा ईव्ही बॅटरी उत्पादकांना, विशेषतः पूर्व भारतातील उत्पादकांना, विश्वासार्ह, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त चाचणी आणि प्रमाणपत्र प्रदान करेल, ज्यामुळे उत्पादन सुरक्षितता, कामगिरी आणि नियामक अनुपालन सुनिश्चित होईल.
याशिवाय या सुविधेमुळे ईव्ही गुणवत्ता हमीसाठी राष्ट्रीय मापदंड स्थापन केला जाईल ज्यामुळे उत्पादकांना पहिल्या टप्प्यातच त्यातील दोष लक्षात येऊन, उत्पादनाची विश्वासार्हता वाढेल तसेच कठोर सुरक्षा आणि कामगिरीच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. तसेच यामुळे ईव्ही ग्राहकांचा विश्वास वाढीला लागेल आणि हरित गतिशीलतेकडे सुरु असलेल्या भारताच्या प्रवासाला गती मिळेल.
अशा प्रकारच्या सुविधेची निर्मिती करून देशात एक मजबूत ईव्ही परिसंस्था निर्माण करण्यासह, आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याची आणि देशांतर्गत उत्पादकांना किफायतशीर चाचणी सुविधा उपलब्ध करुन देण्याची केंद्र सरकारची वचनबद्धता दिसून येते. या विकासासह, नॅशनल टेस्टिंग हाऊस भारताच्या शाश्वत वाहतुकीच्या संक्रमणात एक प्रमुख सक्षमकर्ता आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधांमध्ये जागतिक आघाडीची भूमिका अधिक मजबूत करते.
पर्यावरण स्नेही गतिशीलतेशी सुसंगत उपाययोजना करताना होणाऱ्या जागतिक संक्रमणाच्या अग्रभागी इलेक्ट्रिक वाहने आहेत, ज्यामुळे जीवाष्म इंधनावरील अवलंबित्व कमी होत असून कार्बन उत्सर्जन देखील कमी होत आहे. भारताने 2030 पर्यंत 30 % ईव्ही प्रवेश साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले आहे (30@30). या उद्दिष्टाला पाठिंबा देण्यासाठी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करण्यासाठी ईव्ही आणि त्यांच्या घटकांची कठोर चाचणी, प्रमाणीकरण आणि प्रमाणन आवश्यक आहे याची खात्री करणे आवश्यक आहे.
शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164948)
Visitor Counter : 2