पंतप्रधान कार्यालय
आत्मनिर्भरता आणि विकासाच्या दिशेने भारताच्या सुरु असलेल्या वाटचालीतील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे महत्त्व अधोरेखित करणारा लेख पंतप्रधानांनी केला सामाईक
Posted On:
05 SEP 2025 7:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिलेला एक लेख समाज माध्यमावर सामाईक केला. या लेखात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे महत्त्व अधोरेखित केले गेले असून, हे धोरण आत्मनिर्भरता आणि विकासाच्या दिशेने भारताच्या सुरु असलेल्या वाटचालीच्या केंद्रस्थानी असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेल्या संदेशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला अभिप्राय:
केंद्रीय मंत्री @dpradhanbjp यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे महत्त्व अधोरेखित केले आहे, हे धोरण आत्मनिर्भरता आणि विकासाच्या दिशेने सुरु असलेल्या भारताच्या वाटचालीच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आजचे शिक्षक पीएम PM eVidya, DIKSHA आणि SWAYAM यांसारख्या मंचांच्या आधारे उपलब्ध करून दिलेल्या डिजिटल वर्गखोल्या, कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलते अभ्यासक्रम आणि विविध प्रकारच्या शैक्षणिक गरजांचा त्वरित अवलंब करू लागले असल्याबद्दची माहितीही त्यांनी दिली आहे.
* * *
शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164280)
Visitor Counter : 2
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam